1
|
देवा, माझ्यावर दया कर. दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे. |
2
|
मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे. |
3
|
तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो. मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो. देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो. |
4
|
माझे जीवन संकटात आहे, माझ्याभोवती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे. |
5
|
देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस आणि तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर पसरला आहे. |
6
|
माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला. ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडेन परंतु शेवटी तेच त्या खड्यात पडतील. |
7
|
परंतु देव मला सुरक्षित ठेवील. तो मला साहसी करील. मी त्याचे गुणगान गाईन. |
8
|
माझ्या आत्म्या, जागा हो. सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा. आपण पहाटेला जागवू या. |
9
|
माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो. मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो. |
10
|
तुझे खरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे. |
11
|
देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे. त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे. |
Psalms 57:11 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...