1
|
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे. |
2
|
परमेश्वराने यरुशलेम बांधले, इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते. त्यांना देवाने परत आणले. |
3
|
देव त्यांच्या विदीर्ण ह्दयावर फुंकर घालतो आणि त्यांच्या जखमांना मलम पट्ी करतो. |
4
|
देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते. |
5
|
आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही. |
6
|
परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो. |
7
|
परमेश्वराला धन्यावाद द्या. आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा. |
8
|
देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो. |
9
|
देव प्राण्यांना अन्न देतो, देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो. |
10
|
युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक त्याला आनंद देत नाहीत. |
11
|
जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो. |
12
|
यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर. सियोन तुझ्या देवाची स्तुती कर. |
13
|
यरुशलेम, देव तुझे दरवाजे बुलंद बनवतो आणि देव तुझ्या शहरातल्या लोकांना आशीर्वाद देतो. |
14
|
देवाने तुझ्या देशात शांती आणली. म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही. आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे. |
15
|
देव पृथ्वीला आज्ञा करतो आणि ती त्या आज्ञा त्वरित पाळते. |
16
|
जमीन लोकरी सारखी संपूर्ण पांढरी होई पर्यंत देव हिमवर्षाव करतो. देव गोठलेले बर्फधुळीसारखे हवेत उडू देतो. |
17
|
देव, आकाशतून दगडाप्रमाणे गारांचावर्षाव करतो. तो जी थंडी पाठवतो तिचा सामना कुणीही करु शकत नाही. |
18
|
नंतर देव दुसरी आज्ञा देतो आणि पुन्हा गरम वारे वाहू लागतात. बर्फ वितळायला लागते आणि पाणी वाहायला लागते. |
19
|
देवाने याकोबाला (इस्राएल) त्याची आज्ञा दिली. देवाने इस्राएलला त्याचे नियम दिले. |
20
|
देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही. देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा. |
Psalms 147:12 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...