त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नांवाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.
याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे; कारण तो पवित्र वस्तू देवाकडे घेऊन जातो! तो देवाला पवित्र अन्नार्पण करतो आणि मी पवित्र आहे.
“एखाद्या याजकाची मुलगी वेश्याक्रम करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करुन घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाच्या पावित्र्याला काळिमा लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.
“आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक ह्या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांच्यात शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;
त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये, त्याने अशुद्ध होऊ नये व आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करु नये; त्याच्या डोक्यावर अभिषेकाचे तेल ओतल्यामुळे त्याच्यावर संस्कार झाला आहे व त्यामुळे इतर लोकांपासून तो वेगळा झाला आहे. मी परमेश्वर आहे!
भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे.
“अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यामध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग-शारीरिक दोष-निघाले तर त्याने आपल्या देवाकरिता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये.
शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही माणसाने मला अर्पण आणू नये; याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी:आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
परंतु त्याला व्यंग असल्यामुळे त्याने अंतरपटाच्या आत आणि वेदीजवळ जाऊ नये व माझी परम पवित्र स्ताने भ्रष्ट करु नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे!”