English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Genesis Chapters

Genesis 41 Verses

1 दोन वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडले;ते असे की तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.
2 तेव्हा त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवत खात होत्या.
3 त्यानंतर आणखी सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईच्या बाजूला उभ्या राहिल्या.
4 आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ठ गाईना खाऊन टाकले. त्या नंतर फारो राजा जागा झाला.
5 मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले; त्यात त्याने पाहिले की एकाच ताटाला सात भरदार कणसे आली.
6 त्या नंतर त्या ताटाला सात खुरटलेली व करपलेली अशी सात कणसे आली.
7 नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली; तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले.
8 दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही.
9 तेव्हा प्यालेबरदाराला योसेफाची आठवण आली. तो फारोस म्हणाला, “माझ्या बाबतीत जे घडले त्याची मला आठवण येत आहे;
10 आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस तुरुंगात टाकले होते.
11 तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री आम्हा दोघांना स्वप्ने पडली. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा होता.
12 तेथे कोणी इब्री तरुण आमच्या बरोबर कैदेत होता. तो गारदद्यांच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्यांचे स्पष्टीकरण केले आणि त्याने आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व उलगडा केला.
13 1आणि त्याने सांगितलेला अर्थ खरा ठरला. तो म्हणाला की माझी सुटका होईल व मला पूर्वीप्रमाणे माझ्या कामावर पुन्हा घेतले जाईल आणि अगदी त्याप्रमाणे खरेच घडून आले; आणि तो म्हणाला की आचारी मरेल आणि त्याप्रमाणे तेही खरे झाले.”
14 मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गारद्यांनी योसेफाल ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करुन व स्वच्छ कपडे बदलून फारोपुढे येऊन उभा राहिला.
15 मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”
16 योसेफ म्हणाला, “मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्थ आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
17 मग फारो योसेफला म्हणाला, “स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.
18 तेव्हा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले.
19 त्यानंतर सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर येताना मी पाहिल्या. त्यांच्या सारख्या दुबळ्या व कुरुप गाई मी सबंध मिसर देशात कधीच पाहिल्या नव्हत्या.
20 त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या.
21 तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते; त्या पूर्वी इतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो.
22 “त्यानंतर दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली,
23 मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी करपटलेली, कुरुप व गरम वाऱ्याच्या झळयामुळे करपलेली सात कणसे आली.
24 व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली.“ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?”
25 मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकसारखाच आहे; लवकरच काय होणार आहे हे देव आपणास सांगत आहे;
26 त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे. दोन्हीही स्वप्ने सारखीच आहेत;
27 त्या दुसऱ्या सात रोड गाई व ती सात रोड कणसे म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे. ती सात वर्षे चांगल्या सात वर्षानंतर येतील.
28 लवकरच काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. मी संगितल्याप्रमाणेच हे घडून येईल.
29 सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल व मिसर देशभर भरपूर खावयास असेल.
30 परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशभर पिकलेले धान्य विसरले जाईल; आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील.
31 आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल.
32 “तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोन स्वप्ने पडली ते यासाठी की देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील, हे आपणास दाखवावे.
33 तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे;
34 त्या नंतर शेतकऱ्याकडून धान्य गोळा करण्यासाठी इतर अधिकारी निवडावेत; येत्या सात वर्षांच्या सुकाळात प्रत्येकाने आपल्या धान्याच्या उत्पन्नाचा पांचवा हिस्सा सरकारला द्यावा.
35 अशा रीतीने ही माणसे सुकाळाच्या सात वर्षात पुष्कळ अन्न गोळा करतील आणि गरज पडेपर्यंत नगरात साठवून ठेवतील अशा प्रकारे, फारो, हे अन्न तुझ्या नियंत्रणात राहील.
36 येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा उपयोग होईल. तेव्हा मग दुष्काळाच्या सात वर्षात मिसराच नाश होणार नाही.”
37 फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली; तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली.
38 फारोने म्हटले, “योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य, दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते!”
39 तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही.
40 म्हणून मी तुला या देशाचा (मिसरचा) अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळितील; या देशात केवळ राजासना पुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
41 मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो.”
42 मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गाळ्यात एक सोन्याची साखळी घातली.
43 नंतर फारोने योसेफाला संचलनातील दुसऱ्या रथात बसण्यास सांगितले; खास नेमलेले गारदी पुढे चालले होते; ते ललकारून जाहीरपणे सांगत होते, “लोक हो! आपल्या देशाच्या प्रशासक योसेफ, याला लवून मुजरा करा.”अशी रीतीने योसेफाला मिसर देशाचा प्रशासक (प्रमुख अधिकारी) नेमले.
44 फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.”
45 फारोने योसेफाला सापनाथ-पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पेटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करुन दिली. अशा रीतीने योसेफ सर्व मिसर देशावर प्रशासक झाला.
46 योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली.
47 सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले.
48 योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्न गोळा करुन त्या त्या शेतातले धान्य जवळच्याच नगरोनगरी साठवून ठेवले.
49 योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळू इतके धान्य गोळा करुन साठवून ठेवले; ते इतके होते की त्याचे मोजमाप करता येत नव्हते.
50 योसेफाची बायको ही ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी होती. दुष्काळाच्या सात वर्षांपैकी पहिले वर्ष येण्याअगोदर योसेफ व आसनथ यांना दोन मुलगे झाले.
51 पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे होते; योसेफाने त्याला हे नांव दिले कारण तो म्हणाला, “देवाने मला झालेला त्रास व माझ्यावर झालेला अन्याय, तसेच माझ्या घराकडील सर्व काही यांचा मला विसर पडू दिला.”
52 योसेफाने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले कारण तो म्हणाला, “माझ्यावर संकटे आली परंतु देवाने मला सर्वबाबतीत सफल केले.”
53 सात वर्षापर्यंत मिसरमध्ये भरपूर अन्न होते पण ती वर्षे संपली.
54 परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते.
55 दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी धान्यासाठी फारोकडे ओरड केली; तेव्हा फारो मिसरच्या लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.”
56 तेव्हा चोहीकडे दुष्काळ पडल्यावर योसेफाने मिसरच्या लोकांना धान्य भांडारातून धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार वाईट प्रकारचा दुष्काळ पडला होत.
57 मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.
×

Alert

×