Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

Genesis Chapters

Genesis 31 Verses

Bible Versions

Books

Genesis Chapters

Genesis 31 Verses

1 एके दिवशी लाबानाचे मुलगे आपसात बोलत असताना याकोबाने ऐकले; ते म्हणाले, “आपल्या बापाच्या मालकीचे सर्वकाही याकोबाने घेतले आहे आणि ती धनदौलत घेतल्यामुळे तो श्रीमंत झाला आहे.”
2 तेव्हा लाबान पूर्वी आपल्याशी जसा मित्राप्रमाणे प्रेमाने वागत आला होता तसा तो आता वागत नसल्याचे याकोबाच्या लक्षात आले;
3 परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझे पूर्वज ज्या देशात राहिले त्या तुझ्या देशास तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.”
4 तेव्हा याकोबाने राहेल व लेआ यांना, तो आपले शेरडामेंढरांचे कळप राखीत होता तो तेथे येऊन त्याला भेटण्यास सांगितले;
5 याकोब, राहेल व लेआ यांना म्हणाला, “तुमचा बाप माझ्यावर रागावला असल्याचे मला समजले आहे; पूर्वी तुमचा बाप माझ्याशी नेहमी मित्राप्रमाणे फार प्रेमाने वागत होता, परंतु आता ते तसे वागत नाहीत; परंतु माझ्या वडिलांचा देव माझ्याबरोबर आहे.
6 तुम्हां दोघींनाही माहीत आहे की जेवढे कष्ट घेणे मला शक्य होते तेवढे कष्ट घेऊन मी तुमच्या बापासाठी काम केलेले आहे;
7 परंतु तुमच्या बापाने मला फसवले; त्यानी माझ्या वेतनात दहा वेळा बदल केलेला आहे; परंतु या सर्व काळात लाबानाच्या फसवणूकीच्या कारवाया पासून देवाने माझे रक्षण केले.
8 “एकदा लाबान म्हणाला, ‘सर्व ठिबकेदार शेळ्या तू ठेवून घे, त्या तुला वेतनादाखल होतील,’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व शेळ्यांना ठिबकेदार करडे होऊ लागली; तेव्हा अर्थात् ती सर्व माझी झाली; परंतु मग लाबान म्हणाला, ‘तू बांड्या बकऱ्या घे; त्या तुला वेतना दाखल होतील;’ त्याने असे म्हटल्यानंतर सर्व बकऱ्यांना बांडी करडे होऊ लागली,
9 तेव्हा अशा रीतीने देवाने तुमच्या बापाच्या कळपातून जनावरे काढ्न घेऊन ती मला दिलेली आहेत.
10 “जेव्हा माद्यावर नर उडत होते त्या ऋतूत मला स्वप्न पडले त्यात मी असे पाहिले की फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर उडत होते;
11 देवदूत माझ्याशी बोलला; त्याने मला, ‘याकोब’ म्हणून हाक मारली.मी उत्तर दिले, ‘काय आज्ञा आहे?’
12 “देवदूत म्हणाला, ‘पाहा, फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर माद्यांवर उडत आहेत! हे मी घडवून आणीत आहे. लाबान तुझ्याशी अन्यायाच्या गोष्टी कशा करीत आहे ते मी पाहिलेले आहे; म्हणूनच मी हे करीत आहे की त्यामुळे तुला नवीन जन्मलेली सर्व करडे मिळावीत.
13 बेथेलमध्ये जो मी तुझ्याकडे आला तो मी देव; आहे; त्या ठिकाणी तू वेदी बांधलीस, तिच्यावर तेल ओतलेस आणि तू मला वचन दिलेस आता तू ज्या देशात जन्मलास त्या आपल्या मायदेशी परत जाण्यास तयार असावेस अशी माझी इच्छा आहे.”
14 राहेल व लेआ यांनी याकोबाला उत्तर दिले, “आमच्या बापाच्या मरणानंतर आम्हास वारसा म्हणून मिळण्याकरिता त्यांच्याजवळ काही नाही;
15 आम्ही परक्या असल्यासारखे त्यानी आम्हाला वागवले त्याने आम्हांस तुम्हाला विकून टाकले आहे आणि आमचे सर्व पैसे खर्च करुन टाकले.
16 देवाने ही सर्व संपत्ती आमच्या बापाकडून घेतली आणि आता ती आपली व आपल्या मुळाबाळांची संपत्ती झाली आहे; तेव्हा देवाने तुम्हास जे करावयास सांगितले आहे ते करा!”
17 तेव्हा याकोबाने आपल्या प्रवासाची तयारी केली; त्याने आपल्या बायकामुलांना उंटावर बसवले;
18 नंतर आपला बाप राहात होता त्या कनान देशास परत जाण्यासाठी त्यांनी प्रवास सुरु केला; याकोबाच्या मालकीच्या जनावरांचे कळप त्यांच्यापुढे चालले, पदन अराम येथे राहात असताना त्याने मिळवलेली सर्व मालमत्ता त्याने आपल्या बरोबर नेली.
19 त्याच वेळी लाबान आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यास गेला होता; तो गेला असताना राहेल त्याच्या घरात गेली आणि तिने आपल्या बापाच्या कुलदेवतांच्या मूर्ती चोरल्या.
20 याकोबाने अरामी लाबानास फसवले; कारण आपण येथून निघून आपल्या देशाला जात आहो हे त्याने लाबानास सांगितले नाही;
21 याकोब आपली बायकांमुले व सर्व चीजवस्तू घेऊन ताबडतोब निघाला; त्यांनी फरात नदी ओलांडली आणि ते गिलाद डोंगराळ प्रदेशाकडे निघाले.
22 तीन दिवसानंतर याकोब पळून गेल्याचे लाबानास कळाले.
23 तेव्हा त्याने आपली माणसे एकत्र जमवली आणि याकोबाचा पाठलाग सुरु केला. सात दिवसांनतर गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाजवळ त्याला याकोब सापडला.
24 त्या रात्री देव लाबानाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “लाबाना, सावधान! तू याकोबाशी बोलताना प्रत्येक शब्द संभाळून वापर.”
25 दुसऱ्या सकाळी लाबानाने याकोबाला गाठले; याकोबाने डोंगरावर आपला तळ दिला होता म्हणून लाबानानेही आपल्या बरोबरच्या माणसासह गिलादाच्या डोंगराळ भागात आपला तळ दिला.
26 लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला का फसवलेस? युद्धात धरुन नेलेल्या स्त्रियां प्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास?
27 तू मला न सांगता का पळून गेलास? तुला जायचे आहे असे तू मला सांगितले असतेस तर नाचगाणी बजावणी व संगिताची धामधूम या सहित मी तुला मेजवानी दिली असती;
28 अरे, तू मला माझ्या लाडक्या नातवांचा व माझ्या प्रिय मुलींचा निरोप घेण्याची संधी ही दिली नाहीस की त्यांची चुंबने घेण्यास सवड दिली नाहींस! तू हा अगदी मूर्खपणा केलास!
29 खरे तर अपाय करण्याची माझ्यात ताकद आहे परंतु गेल्या रात्री तुझ्या बापाचा देव माझ्या स्वप्नात आला आणि मी तुला कोणत्याच प्रकारे अपाय करु नये म्हणून त्याने मला ताकीद दिली आहे;
30 तुला तुझ्या बापाच्या घरी जायचे आहे हे मला माहीत आहे आणि म्हणूनच तू जाण्यास निघालास परंतु तू माझ्या घरातील कुलदेवाता का चोरल्यास?”
31 याकोबाने उत्तर दिले, “मी तुम्हाला न सांगता निघालो कारण मला भीती वाटली; मला विचार आला की तुम्ही तुमच्या मुली माइयापासून घेऊन जाल;
32 परंतु मी तुमच्या कुलदेवता मुळीच चोरल्या नाहीत. जर येथे माझ्याबरोबर असणाऱ्या कोणी तुमच्या कुलदेवता घेतल्या आहेत असे तुम्हाला आढळले तर ती व्यक्ती ठार केली जाईल; तुमची माणसे या बाबतीत माझे साक्षी असतील; तुमच्या कोणत्याही चीजवस्तूसाठी तुम्ही झडती घेऊ शकता; जे काही तुमचे असेल ते घेऊन जा.” (राहेलीने लाबानाच्या कुलदेवाता चोरल्या होत्या ते याकोबास माहीत नव्हते.)
33 म्हणून मग लाबानाने याकोबाच्या छावणीची झडती घेतली; त्याने याकोबाच्या तंबूची व नंतर लेआच्या तंबूची झडती घेतली; त्यानंतर त्याच्या घरातील कुलदेवता सापडल्या नाहीत. त्यानंतर लाबान राहेलीच्या तंबूत गेला.
34 राहेलीने त्या कुलदेवता आपल्या उंटाच्या कंठाळीत लपवून ठेवल्या होत्या आणि ती त्यांच्यावर बसली होती. लाबानाने सगळा तंबू शोधून पाहिला परंतु त्या कुलदेवता कोठेही सापडल्या नाहीत.
35 आणि राहेल आपल्या बापाला म्हणाली, “बाबा, मी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही म्हणून माझ्यावर रागावू नका, कारण माझा मासिक धर्म आला आहे.” अशी रीतीने लाबानाने तळाची कसून तपासाणी केली परंतु त्याला कुलदेवता सापडल्या नाहीत.
36 मग याकोबाला फार राग आला. तो म्हणाला, “मी काय वाईट केले आहे? मी कोणता करार मोडला आहे? माझा पाठलाग करण्याचा आणि मला थांबविण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे?
37 माझ्या मालकीच्या सर्व चीजवस्तू तुम्ही तपासून पाहिल्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या मालकीची एकही चीजवस्तू आढळली नाही; जर तुम्हाला तुमचे काही मिळाले असेल तर ते मला दाखवा; ते या ठिकाणी समोर ठेवा म्हणजे तुमची आमची माणसे ते बघतील. तुमच्या व माझ्यामध्ये कोण खरा आहे हे या माणसांना ठरवू द्या.
38 मी तुमची वीस वर्षे सेवाचाकरी केलेली आहे. त्या सर्व काळात एकही करडू किंवा कोकरु मेलेले जन्मले नाहीं; आणि तुमच्या कळपातील एकही एडका मी खाल्या नाही.
39 एखाद्या वेळी जर एखादी मेंढी जनावरांनी ठार मारली तर ती मी नेहमीच माझ्या कळपातून भरुन दिली. मी कधीही मेलेले जनावर तुमच्याकडे घेऊन आलो नाही आणि यात माझा काही दोष नाही असे म्हणालो नाही. दिवसा व रात्री मी तुमच्या कळपाची काळजी घेतली.
40 दिवसा सूर्याच्या उन्हातापाने माझी शक्ती क्षीण होई व रात्री थंडीगारठ्यामुळे माझ्या डोळ्यातील झोंप काढून घेतली जाई.
41 वीस वर्षे एखाद्या गुलामासारखी मी तुमची सेवाचाकरी केली; पाहिली चौदा वर्षे तुमच्या दोन मुली जिंकण्यासाठी आणि शेवटची सहा वर्षे तुमचे कळप वाढावेत म्हणून मी कष्ट केले; आणि त्या काळात दहा वेळा तुम्ही माझ्या वेतनात फेरबदल केला;
44 म्हणून मी तुझ्याशी करार करण्यास तयार आहे. आपण करार केला आहे हे दाखविण्यासाठी खूण म्हणून येथे दगडांची रास रचू.”
45 तेव्हा याकोबास एक मोठा धोंडा सापडला. तो त्याने करार केला होता हे दाखविण्यासाठी तेथे ठेवला.
46 त्याने त्याच्या माणसांना आणखी काही दगड शोधून त्यांची रास करण्यास सांगितले. नतर त्या दगडांच्या राशीशेजारी बसून ते जेवले.
47 लाबानाने त्या जागेचे नाव यगर सहादूथा ठेवले; परंतु याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले. (गलेद हे गिलादाचे दुसरे नाव, हिब्रू भाषेत ‘कराराची - दगडांची रास’)
48 लाबान याकोबास म्हणाला, “ही दगडांची रास आपण केलेल्या कराराची आठवण ठेवण्यास आपणा दोघास मदत करील.” म्हणूनच याकोबाने त्या जागेचे नाव गलेद ठेवले.
49 मग लाबान म्हणाला, “आपण एकमेकापासून अलग होत असताना परमेश्वर आपणावर लक्ष ठेवो.” म्हणून त्या जागेचे नाव मिस्पा ठेवण्यात आले.
50 नंतर लाबान म्हणाला, “जर का तू माझ्या कन्यांना दु:ख देशील तर देव तुला शिक्षा करील हे लक्षात ठेव. जर का तू इतर स्त्रियांशी लग्न करशील तर देव पाहात आहे हे लक्षात ठेव.
51 आपणामध्ये येथे साक्षी म्हणून मी ही दगडांची रास ठेवली आहे आणि हा येथे विशेष स्तंभ आहे त्यावरुन आपण येथे करार केला हे दिसेल.
52 ही रास व हा स्तंभ ही दोन्ही आपल्यातील कराराची आपणास आठवण देण्यास मदत करोत ही ओलांडून मी तुझ्या विरुद्व भांडणतंटा करण्यास तुझ्याकडे कधीही जाणार नाही आणि तू ही माझ्याविरुद्व भांडणतंटा करण्यास माझ्या बाजूकडे, ही ओलांडून कधीही येऊ नये.
53 जर आपण हा करार मोडल्याचा दोष करु तर अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या पितरांचा देव आमचा न्याय करो व आम्हास दोषी ठरवो.”याकोबाचा बाप, इसहाक देवाला “भय” म्हणत असे म्हणून याकोबाने “भय” हे नाव वापरुन शपथ घेतली.
54 मग याकोबाने त्या डोंगरावर एक पशू मारला व तो देवाला देणगी म्हणून अर्पण केला आणि त्याने आपल्या सर्व माणसांना भोजनासाठी येऊन सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. भोजन संपल्यावर त्यांनी ती रात्र डोंगरावरच घालवली.
55 दुसऱ्या दिवशी लाबान पहाटेस उठला. त्याने आपल्या कन्या व आपली नातवंडे यांची चुंबने घेऊन त्यांचा निरोप घेतला. त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि मग तो आपल्या घरी परत गेला.

Genesis 31:53 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×