Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Books

Galatians Chapters

Galatians 4 Verses

1 मी जे म्हणत आहे ते हे की, जोपर्यंत वारसदार हा लहान मूल आहे तोपर्यंत तो गुलामापेक्षा वेगळा नाही. जरी तो सर्वांचामालक असला तरी,
2 तो जोपर्यंत त्याच्या पित्याने नेमून दिलेला वेळ आहे तोपर्यंत पालकांच्या आणि विश्वास्तांच्या ताब्यातअसतो.
3 याच प्रकारे जोपर्यंत आम्ही “मुले” होतो तोपर्यंत आम्हीसुद्धा या जगाच्या निरर्थक नियमांचे गुलाम होतो.
4 परंतुजेव्हा काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविला, जो स्त्रीपासून जन्मला, व नियम शास्त्राप्रमाणे वागला.
5 यासाठी की, त्याने जे नियमशास्त्राधीन होते त्यांना सोडवावे व देवाची मुले म्हणून स्वीकारावे.
6 आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात, म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंत:करणात पाठविले आहे. आत्मा“अब्बा”म्हणजे “पित्या” अशी हाक मारतो.
7 म्हणून तू आता गुलाम नाही, तर एक पुत्र आहेस, आणि जर पुत्रआहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे.
8 गतकाळात जेव्हा तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने जे देव नव्हते, त्यांचे तुम्ही गुलाम होता.
9 परंतुआता तुम्ही देवाला ओळखता किंवा आता देवाने तुमची ओळख करुन घेतली आहे. तर मग आता तुम्ही ज्यांचे गुलामहोण्याचे प्रयत्न करीत आहात त्या दुर्बल आणि निरुपयोगी नियमाकडे कसे वळता?
10 तुम्ही विशेष दिवस, महिने, ऋतूआणि वर्षे पाळता.
11 मला तुमच्याविषयी भीती वाटते मला वाईट वाटते की, मी तुमच्यासाठी केलेले श्रम व्यर्थ आहेत.
12 बंधूनो, मी तुम्हांला कळकळीची विनंति करतो की कृपा करुन माझ्यासारखे व्हा. कारण मी तुमच्यासारखा झालो, असेकाही नाही की, तुम्ही माझे काही वाईट केले होते.
13 तुम्हांला माहीत आहे की, माझ्या शारीरिक दुर्बलतेमुळे प्रथमत: मीतुम्हांला सुवार्ता सांगितली.
14 आणि माझ्या शारीरिक दुर्बलतेबाबत तुमची कठीण परीक्षा होत असतानाही उलट माझे एखाद्यादेवदूतासारखे तुम्ही स्वागत केले, जणू काय मीच स्वत: ख्रिस्त असल्यासारखे स्वागत केले.
15 मग जो आनंद तुम्हांलामिळाला तो कोठे आहे? कारण मी तुम्हांविषयी साक्ष देतो की, जर तुम्ही समर्थ असता तर तुम्ही तुमचे स्वत:चे डोळेकाढून ते मला दिले असते.
16 तुम्हांला खरे सांगितले म्हणून मी तुमचा वैरी झालो काय?
17 तुम्ही नियमशास्त्र पाळावे असे ज्यांना वाटते त्यांना तुमच्याविषयी उत्साहवर्धक आस्था आहे, पण चांगल्या हेतूसाठीनाही. मझ्यापासून तुम्हांला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी की तुम्हांला त्याच्याविषयी उत्साहवर्धक आस्थावाटेल.
18 हे नेहमीच चांगले असते की, कोणासाठी तरी विशेष (उत्साहवर्धक) आस्था असावी पण ती कोणत्या तरीचांगल्या गोष्टीसाठी आणि मी जेव्हा तुमच्याबरोबर असतो, फक्त तेव्हाच नव्हे.
19 माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यामुळे मीपुन्हा एकदा प्रसूतिवेदनातून जात आहे आणि तुम्ही ख्रिस्तासारखे होईपर्यंत मला तसे करावेच लागेल.
20 आता मलातुमच्याबरोबर तेथे हजर राहावेसे व स्वर बदलून वेघळ्या प्रकारे बोलावेसे वाटते, कारण तुमच्याविषयी मी गोंधळात पडलो आहे.
21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन राहू इच्छिता त्या तुम्हांला मला विचारु द्या की, नियमशास्त्र काय म्हणते, ते तुम्हांला माहीतआहे का?
22 असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्रस्त्रीपासून जन्मलेला
23 देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला.
24 या गोष्टी दृष्टांतरुप आहेत, त्या स्त्रिया दोन करार आहेत. एक करार सीनाय पर्वतावर झाला. आणि ज्यांच्या नशिबीगुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला. हा करार हागारशी संबंध दर्शवितो.
25 हागार ही अरबस्तानातील सीनायपर्वताचे दर्शक हल्लीच्या यरुशलेमचे बाह्यरुप आहे. कारण ती आपल्या मुलासह गुलामगिरीत आहे.
26 परंतु स्वर्गीययरुशलेम स्वतंत्र आहे. स्वर्गीय यरुशलेम ही आमची आई आहे.
27 कारण असे लिहिले आहे.जिने जन्म दिला नाही, त्या मूल नसलेल्या (स्त्रीने) आनंद करावा! ज्या तुला प्रसूतिवेदना झालेल्या नाहीत ती तू आनंदानेघोष कर, आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत”यशया 54:1
28 बंधूनो, आता तुम्ही इसहाकासारखी देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मलेली मुले आहात, परंतु तो त्यावेळीजसा देहस्वभावाप्रमाणे जन्मला होता व त्याने आत्म्याच्या सामर्थ्याने जन्मलेल्यांचा छळ केला तसे आता आहे.
30 पणपवित्र शास्त्र काय सांगते? “त्या गुलाम मुलीला व तिच्या पुत्राला घालवून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्यामुलाबरोबर वारस होणार नाही.”
31 यासाठी बंधूंनो, आपण गुलाम मुलीची नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
×

Alert

×