तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकचा मुलगा येशूवा यांनी यरुशलेममधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली, देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना याबाबतीत सहाय्य केले.
त्यावेळी ततनइ हा फरात नदीच्या पश्रिमेकडील प्रदेशाचा अधिकारी होता. तो, शथर - बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना ततनइ व त्याच्याबरोबरच्या लोकांनी विचारले, “तुम्हाला हे मंदिर पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?
तरी पण यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारयावेशला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.
हे राजा, आम्ही यहूदाप्रांतात गेल्याचे तुम्हाला माहीत आहे. आम्ही महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहुदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहुदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल.
त्यांनी आम्हाला पुढीलप्रमाणे उत्तर दिले:“आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत.
आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने देवाचा कोप ओढवला. तेव्हा परमेश्वराने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिले. नबुखद्नेस्सराने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांना जबरदस्तीने कैद करुन बाबेलला नेले.
तसेच, पूर्वीच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात ठेवली होती, ती कोरेशाने बाहेर काढली. नबुखद्नेस्सराने ती पूर्वी यरुशलेममधून काढून बाबेलच्या खोट्या देवतेच्या देवळात आणली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या (म्हणजेच जरुब्बाबेलाच्या) स्वाधीन केली. त्याला कोरेशने अधिकारी म्हणून नेमले.”
नंतर कोरेश शेशबस्सरला (जरुब्बाबेलला)’ म्हणाला, “ही सोन्यारुप्याची पात्रे घे आणि यरुशलेममधील मंदिरात ठेव. मंदिर पूर्वी जिथे होते त्याचठिकाणी पुन्हा बांध”
तेव्हा आता हवे असल्यास राजाने अधिकृत कागदपत्रे नीट तपासून पाहावीत. यरुशलेममधील मंदिर पुन्हा बांधायची राजा कोरेशने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते पडताळून पाहावे आणि या बाबतीत आपण काय ठरविले आहे ते राजाने आम्हाला कृपया लेखी कळवावे.