English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Ezekiel Chapters

Ezekiel 43 Verses

1 पूर्वेकडे तोंड असलेल्या दाराजवळ त्या माणसाने मला नेले.
2 पूर्वेकडून तेथे इस्राएलच्या देवाची प्रभा फाकली. समुद्राच्या गर्जनेप्रमाणे देवाचा आवाज प्रचंड होता. त्याच्या प्रभेने भूमी उजळली होती.
3 मी खबार कालव्याजवळ पाहिलेल्या दृष्टान्तासारखाच हा दृष्टान्त होता मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
4 परमेश्वराची प्रभा पूर्वेच्या दारातून मंदिरात आली.
5 मग वाऱ्यानेमला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. मंदिर परमेश्वराच्या प्रभेने भरुन गेले.
6 मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच उभा होता.
7 मंदिरातील आवाज मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही माझ्या सिंहासनाची व चरणासनाची जागा आहे. येथे मी इस्राएलच्या लोकांमध्ये कायमचा राहीन. इस्राएलचे लोक माझ्या पवित्र नावाला पुन्हा कलंक लावणार नाहीत. राजे आणि राजघराण्यातील लोक, व्याभिचाराचे पाप करुन अथवा राजांची प्रेते ह्या जागी पुरुन पुन्हा कधीही माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.
8 माझ्या उंबऱ्याला त्यांचा उंबरा आणि माझ्या दाराच्या खांबाला त्यांच्या दाराचा खांब लावून, ते मला बदनाम करणार नाहीत. पूर्वी, त्यांच्या आणि माझ्यामध्ये फक्त एक भिंत होती. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक वेळी पाप करताच अथवा भयंकर गोष्ट करताच माझी अप्रतिष्ठा झाली. म्हणूनच मला राग आला व मी त्यांचा नाश केला.
9 आता त्यांना व्यभिचाराचे पाप सोडून देऊ देत व त्यांच्या राजांची प्रेते माझ्यापासून दूर ठेवून देत. म्हणजे मी कायमचा त्यांच्यात राहीन.
10 “आता, मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांना मंदिराबद्दल सांग. मंदिराच्या योजनेबद्दल त्यांना कळेल. तेव्हा त्यांना त्यांच्या पापाची लाज वाटेल.
11 मग त्यांना, स्वत: केलेल्या वाईट कृत्यांची लाज वाटेल. त्यांना मंदिराच्या रचनेबद्दल कळू दे. ते कसे बांधले आहे, प्रवेशद्वारे व बाहेर पडण्याची दारे कोठे आहेत, सर्व नक्षीकाम कसे आहे ह्याबद्दल त्यांना समजू दे. त्यांना मंदिराबद्दलचे सर्व विधिनियम शिकव. हे सर्व तू लिहून ठेव म्हणजे सर्वजण ते पाहू शकतील. मग ते मंदिराबाबतचे सर्व विधिनियम पाळतील. ते ह्या गोष्टी करु शकतील.
12 मदिराचा नियम पुढीलप्रमाणे आहे पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अती पवित्र आहे. हा मंदिराचा नियम आहे.
13 “लांब मोजपट्टीचाउपयोग करुन, हाताच्या मापात, वेदीची मापे पुढीलप्रमाणे आहेत. वेदीच्या तळाला सर्व बाजूंनी पन्हळ होती. ती 1 हात (1 फूट 9 इंच) खोल व 1 हात (1 फूट 9 इंच) रुंद होती. तिच्या काठाजवळची कड वीतभर (9 इंच) उंच होती. वेदीची उंची पुढीलप्रमाणे होती.
14 जमिनीपासून खालच्या कंगोऱ्यापर्यंत तळ 2 हात (3 फूट 6 इंच) होता. व रुंदी 1 हात (1 फूट 9 इंच) होती. वेदी लहान कंगोऱ्यापासून मोठ्या कंगोऱ्यापर्यंत 4 हात (7 फूट) होती. ती 2 हात (3 फूट 6 इंच) रुंद होती.
15 वेदीवरील आग्निकुंड 4 हात (7 फूट) उंच होता. प्रत्येक कोपऱ्याला एक अशी वेदीला चार शिंगे होती.
16 वेदीवरील अग्निकुंडाची लांबी 12 हात (21 फूट) व रुंदी 12 हात ( 21 फूट) होती. म्हणजेच ते अगदी बरोबर चौरसाकृती होते.
17 कंगोरासुद्धा चौरसाकृतीच होता. तो 14 हात रुंद होती. तळाजवळची पन्हळ 2 हात (3 फूट 6 इंच) रुंद होती. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”
18 (18-19) मग तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘वेदीसंबंधी काही नियम आहेत. ज्या दिवशी बळी अर्पण करण्यासाठी आणि रक्तसिंचन करण्यासाठी ह्या वेदीची स्थापना होईल, त्या दिवशी सादोकच्या घराण्यातील माणसांना पापार्पण म्हणून तू गोऱ्हा देशील. सादोक हे लेवीच्या कुळातील आहेत. ते याजक आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणाला, ते मला पवित्रपदार्थ दाखवितील व माझी सेवा करतील.
20 “तू गोऱ्ह्याचे रक्त वेदीच्या चारी शिंगावर, कंगोऱ्याच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपडशील. अशा रीतीने तू वेदी शुद्ध करशील.
21 मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याचे मंदिराच्या इमारतीच्या बाहेर, मंदिराच्या आवारात योग्य जागी हवन कर.
22 “दुसऱ्या दिवशी तू निर्दोष बोकड अर्पण करशील. तो पापार्पणासाठीच असेल. गोऱ्हाच्या रक्ताने ज्याप्रमाणे वेदी शुद्ध केली गेली, त्याचप्रमाणे याजक ती शुद्ध करतील.
23 वेदीची शुध्दता झाल्यानंतर निर्दोष गोऱ्हा व कळपातील निर्दोष मेंढा अर्पण करशील.
24 तू हे परमेश्वराला अर्पण करशील. याजक त्यावर मीठ टाकतील. मग ते त्यांना होमार्पण म्हणून अर्पण करतील.
25 तू सात दिवस, पापार्पण म्हणून रोज एक बोकड, एक गोऱ्हा व एक मेंढा अर्पणासाठी तयार ठेवशील. गोऱ्हा व मेंढा हे निर्दोष असले पाहिजेत.
26 सात दिवस, याजक, वेदीची शुद्धता करतील. मग ते वेदी देवाच्या उपासनेसाठी तयार करतील.
27 वेदी तयार करुन, परमेश्वराला अर्पण करण्यात सात दिवस जातील. आठव्या दिवसापासून, याजक होमार्पणे व शांत्यर्पणे करु शकतील आणि मी तुमचा स्वीकार करीन.” असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला.
×

Alert

×