चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते. ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
प्रेतयात्रेला जाणे हे एखाद्या समारंभाला जाण्यापेक्षा चांगले असते. का? कारण सगव्व्या माणसांना मरणे भाग असते आणि प्रत्येक जिवंत माणसाने हे मान्य करायला हवे.
जेव्हा आयुष्य चांगले असते तेव्हा त्याचा उपभोग घ्या आणि जेव्हा ते कठीण असते तेव्हा देव आपल्याला चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही वेळा देतो हे लक्षात ठेवा. आणि भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाही कळत नाही.
(19-20) या पृथ्वीवर सदैव चांगल्या गोष्टी करणारा आणि कधीही पाप न करणारा असा माणूस नाही.शहाणपण माणसाला शक्ती देते. एक शहाणा माणूस दहा मूर्ख नेत्यांपेक्षा अधिक बलवान असतो.
मी खूप अभ्यास केला आणि खरे शहाणपण शोधण्याचा कसून प्रयत्न केला. मी प्रत्येक गोष्टींसाठी कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मी काय शिकलो? मला हे कळले की दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुध्द वेडेपणा आहे.
मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.
(27-28) गुरू म्हणतात, “मी सगळचा गोष्टी एकत्र केल्या कारण त्यांचे उत्तर काय येते ते मला पहायचे होते. मी अजूनही उत्तर शोधत आहे. परंतु मला हे मात्र मिळाले. मला हजारात एक चांगला माणूस मिळाला. पण मला एकही चांगली स्त्री मिळाली नाही.