Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Books

Ecclesiastes Chapters

Ecclesiastes 2 Verses

1 मी स्वत:शी म्हणालो, “मी मौज-मजा करायला हवी. जितका शक्य होईल तितका आनंद मी उपभोगायला हवा.” पण हेही अगदीच टाकाऊ आहे हे मला समजले.
2 सतत हसत राहणे हाही एक मूर्खपणाच आहे. मौजमजा करण्यातून काहीही चांगले घडत नाही.
3 म्हणून माझे मन शहाणपणाने भरता भरता माझे शरीर मद्याने (द्राक्षारसाने) भरायचे असे मी ठरवले. मी हा मूर्खपणा करायचे ठरवले कारण मला सुखी व्हायचा मार्ग शोधायचा होता. लोकांना त्यांच्या छोट्याशा आयुष्यात चांगले करण्यासारखे असे काय आहे ते मला शोधायचे होते.
4 नंतर मी महान गोष्टी करायला सुरुवात केली. मी घरे बांधली, मी स्वत:साठी द्राक्षाचे मळे लावले.
5 मी बागा लावल्या आणि मोठमोठे बगिचे केले. मी सर्व प्रकारची फळझाडे लावली.
6 मी माझ्यासाठी तळी निर्माण केली. आणि त्या तव्व्यांचा उपयोग मी माझ्या वाढणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी केला.
7 मी पुरुष आणि स्त्री गुलामांना विकत घेतले, आणि माझ्या घरातही गुलामांचा जन्म झाला. माझ्याजवळ खूप मोठया गोष्टी होत्या. माझ्याजवळ जनावरांची खिल्लारे आणि मेंढ्यांचे ढकळप होते. यरुशलेममधील कोणाही माणसाजवळ नसतील इतक्या गोष्टी माझ्याजवळ होत्या.
8 मी स्वत:साठी सोने आणि चांदी गोळा केली. मी राजांकडून, त्याच्या देशांकडून संपत्ती घेतली. माझ्यासाठी गाणे म्हणणारे स्त्री पुरुष माझ्याजवळ होते. कोणालाही हव्याहव्याशा वाटणाऱ्य गोष्टी माझ्याजवळ होत्या.
9 मी खूप श्रीमंत आणि प्रसिद्ध झालो. माझ्या आधी यरुशलेममध्ये राहणाऱ्य कोणाही माणसा पेक्षा मी मोठा होतो आणि माझे शहाणपण मला मदत करण्यासाठी नेहमी तयार होते.
10 माझ्या डोव्व्यांना जे जे दिसे आणि हवेसे वाटे ते मी मिळवले. मी जे केले त्यामुळे माझे मन प्रसन्न असे आणि हा आनंद माझ्या कष्टांचे फळ होते.
11 परंतु नंतर मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांच्याकडे पाहिले. मी जे कष्ट केले त्यांच्याकडे पाहिले. आणि ते सर्व म्हणजे वेळेचा अपव्यय होता असे मी ठरवले. वाऱ्याला पकडण्यासारखेच ते होते. आपण जीवनात जे काही करतो त्यापासून काहीही लाभ होत नाही.
12 कोठलाही माणूस राजापेक्षा अधिक काही करू शकत नाही एखाद्या राजाने तुम्हाला जे करावेसे वाटते ते आधीच केलेले असते. आणि राजा ज्या गोष्टी करतो त्या करणे म्हणजेही वेळेचा अपव्यय आहे हेही मला समजले. म्हणून मी पुन्हा पुन्हा शहाणे व मूर्ख होण्याचा आणि वेड्या गोष्टी करण्याच्या बाबतीत विचार करू लागलो.
13 शहणपण हे मूर्खपणापेक्षा चांगले आहे. जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
14 ते असे आहे: शहाणा माणूस त्याच्या मनाचा उपयोग डोव्व्यांप्रमाणे, त्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी करतो. परंतु मूर्ख मात्र अंधारात चालणाऱ्या माणसासारखा असतो.परंतु मूर्ख आणि शहाणा हे दोघेही सारख्याच रीतीने नाश पावतात. दोघेही मरतात.
15 मी स्वत:शीच विचार केला, “‘मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वत:शीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.”
16 शहाणा आणि मूर्ख दोघेही मरणारच आणि लोक शहाण्या माणसाचे अथवा मूर्ख माणसाचे सदैव स्मरण कधीच ठेवणार नाहीत. त्यांनी जे जे केले ते सर्व लोक भविष्यात विसरून जातील. म्हणून शहाणा माणूस आणि मूर्ख माणूस दोघेही समान आहेत.
17 यामुळे मला जीवनाचा तिरस्कार वाटायला लागला. जीवनातील सर्व गोष्टी वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारख्या निरुपयोगी आहेत या विचाराने मला खूप दु:ख झाले.
18 मी जे अपार कष्ट केले त्याचा मी किरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्याना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही.
19 मी जो अभ्यास केला आणि काम करून जे मिळवले त्याच्यावर इतरांचीच सत्ता राहणार आहे आणि तो माणूस शहाणा आहे की मूर्ख ते मला माहीत नाही. हेही निरर्थकच आहे.
20 म्हणून मी माझ्या सर्व कामांबद्दल दु:खी झालो.
21 माणूस आपले सर्व ज्ञान, शहाणपण आणि कौशल्य वापरून कष्ट करू शकतो. पण तो माणूस मरेल आणि इतरांना त्याच्या कष्टाचा फायदा मिळेल. त्या लोकांनी कष्ट केले नाहीत तरी त्यांना सगळे काही मिळेल. त्यामुळे मला खूप दु:ख झाले. ते योग्य नाही आणि शहाणपणाचेही नाही.
22 माणसाने खुप कष्ट केल्यावर आणि भांडल्यावर त्याला आयुष्यात खरोखर काय मिळते?
23 आयुष्यभर त्याला दु:ख, मनस्ताप आणि कष्टच मिलतात. त्याचे मन रात्रीदेखील स्वस्थ नसते. हे सुध्दा शहाणपणाचे नाही.
24 एक तरी माणूस असा आहे का ज्याने माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आयुष्य उपभोगले? नाही. आणि मी हे शिकलो: माणसाला करता येण्यासारखी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि त्याला करायला लागणारे काम आवडीने करणे. हे सर्व देवाकडूनयेते हेही मी पाहिले.
26 जर माणसाने चांगले कृत्य केले आणि देवाला प्रसन्न केले तर देव त्याला शहाणपण,ज्ञान आणि आनंद देईल. पण जो माणूस पाप करतो त्याला वस्तू गोळा करायचे आणि त्यांचे ओझे वहायचे काम मिळेल. देव वाईट माणसाकडून घेतो आणि चांगल्या माणसाला देतो. पण त्याचे सर्व काम निरुपयोगी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
×

Alert

×