Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Books

Acts Chapters

Acts 20 Verses

1 जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलाविले आणि त्यांना उत्तेजत दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला.
2 मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला.
3 त्या ठिकाणी तो तीन माहिने राहिला. पौल सूरियाला समुद्रमार्गे निघाला असता, यहूदी लोकांनी त्याच्याविरुद्ध कट रचला, हे पाहून त्याने मासेदोनियातून परत फिरण्याचे ठरविले.
4 त्याच्याबरोबर काही लोक होते ते असे: बिरुया शहराच्या पुरर्ाचा मुलगा सोपत्र. थेस्सलनीका येथील अरिस्तार्ख व सकूंद, दर्बे येथील गायस आणि तीमथ्य, तुखिक व त्रफिम हे आशिया प्रांतातील होते.
5 ही माणसे आमच्यापुढे गेली व त्रोवस येथे आमची वाट पाहू लागली.
6 बखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसांनी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
7 मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठीएकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
8 वरच्यामजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते.
9 युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता. पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, जेव्हा त्याला उचलले, तेव्हा तो मेलेला आढळला.
10 पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी कवेत धरुन म्हणाला, “चिंता करु नका! त्याच्यात अजून जीव आहे.”
11 मग पौल वर गेला. त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली. पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला.
12 त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.
13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वत: पायी जायचे.
14 जेव्हा आम्हांला तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्याला जहजात घेतले, आणि आम्ही मितुलेनाला गेलो.
15 दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुले नाहून निघालो व खियासमोर आलो. मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेतला आलो.
16 कारण पौलाने ठरविले होते की इफिस येथे थांबायचे नाही. आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणसाठी त्याला यरुशलेम येथे राहावयास हवे होते.
17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.
19 मी प्रभूची सेवा पूर्ण नम्रतेने व रडून केली. यहूदी लोकांनी केलेल्या कटामुळे निर्माण झालेल्या उपद्रवांना तोंड देत मी त्याची सेवा केली.
20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हांला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हांना माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
21 पश्चाताप करुन देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांना सारखीच साक्ष दिली.
22 आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेमला चाललो आहे, आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही.
23 मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो
24 मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.
25 “राच्याची करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हांतील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे.
26 म्हणून मी तुम्हांला जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे.
27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हांला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वत:चे रक्त देऊन विकत घेतली.
29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत.
30 तुमच्यामधूनसुद्धा लोक उठतील, चुकीचे असे तुम्हांला शिकवून आपल्या मागे घेऊन जातील.
31 यासाठी सावध राहा. तुम्हांतील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रु आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
32 आणि आता मी तुम्हांला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे.
33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही.
34 मी आपल्या स्वत:च्या व माझ्याबरोबर राहणाऱ्यांच्या गरजा माझ्या हातांनी भागविल्या हे तुम्हांला चांगले माहीत आहे.
35 अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालून दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वत: मेहनत करुन मदत केली पाहिजे. व प्रभु येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. तो स्वत: म्हणाला, ‘घेण्यापेक्षा देणे अधिक आशीर्वादाचे असते.”‘
36 आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.
37 तेव्हा प्रत्येकाला खूपच रडू आले, ते पौलाच्या गळ्यात पडले व त्याचे मुके घेत राहिले.
38 ते पुन्हा त्याला कधीही पाहू शकणार नाहीत, या वाक्याने त्यांना फार दु:ख झाले, मग ते त्याला जहाजापर्चंत निरोप देण्यास गेले.
×

Alert

×