Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Books

2 Peter Chapters

2 Peter 2 Verses

1 तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार. ते लोकांमध्ये विध्वंसक विचारपसरवतील. आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत. असे करण्याने तेस्वत:वर ताबडतोब नाश ओढवून घेतील.
2 तसेच पुष्कळ लोक प्रखर लैंगिक वासनांच्या आहारी जाऊन अनैसर्गिक शरीरव्यवहारात गुरफटतील. त्यांच्यामुळे खऱ्या मार्गाची निंदा होईल.
3 त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्याशिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही तर त्यांचानाश त्यांची वाट पाहत आहे.
4 कराण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडदअंधारात टाकले.
5 देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीनेराहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावरपाण्याचा महापूर आणाला.
6 देवाने सदोम व गमोरा या शहरांना जाळून बेचिराख करण्याची शिक्षा दिली व भविष्याकाळातअनैतिक लोकांचे काय होईल हे या उदाहरणाने दाखवून दिले.
7 आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनीलोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली.
8 दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना, त्यानियमविरहीत लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक ह्रदय, फाटून जाते कीकाय असे त्याला वाटत होते.
9 अशा प्रकारे, प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दु:खापासून सुटका कशी करायची हे माहीतआहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे.
10 विशेषत: जे पापमयवासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोकगौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत.
11 याउलट देवदूत जे या लोकांपेक्षा सामर्थ्याने व बळाने महान आहेत, ते देवासमोर या लोकांविरुद्ध अपमानास्पद गैर काहीबोलत नाहीत.
12 परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत.ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्याशिक्षकांचाही) नाश केला जाईल.
13 आणि त्यांनी इतरांना दुखावल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखाविण्यातयेईल. भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. तेतुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात.
14 त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडेकामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापातओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.
15 सरळ वाट सोडून ते भलतीकडेभरकटत गेले आहेत. बौराचा पुत्र बलाम याच्यासारखी वाट त्यांनी धरली आहे. बलामाला अयोग गोष्टी करण्याकरिता लाचघेणे आवडत असे.
16 परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवानेमाणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.
17 हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगविलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखूनठेवली आहे.
18 ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या सांगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागलेआहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात.
19 हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांनामोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वत:च नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडाबसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.
20 म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते,त्यांची जगाच्या दूषित वातावारणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपलापगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते.
21 त्यांना जर चांगला मार्ग माहीतझाला नसता तर चांगले झाले असते कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासूनत्यांनी वळणे, यापेक्षा (अगोदरची स्थिती चांगली होती.)
22 त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितलेआहे: “आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा” आणि दुसऱ्या म्हणीत: “स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.”
×

Alert

×