Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Books

2 Kings Chapters

2 Kings 16 Verses

1 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलचा राजा होता. त्याच्या सतराव्या वर्षी योथामचा मुलगा आहाज यहूदाचा राजा झाला.
2 आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये निषिध्द म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराचे आज्ञापालन करत नसे.
3 त्याची वागणूक इस्राएलच्या राजांसारखी होती. आपल्या मुलालाही त्याने अग्रीतून चालायला लावले. इस्राएली आले तेव्हा परमेश्वराने ज्या लोकांना त्या प्रदेशातून जबरदस्तीने हद्दपार केले त्यांच्यासारखी भीषण कृत्ये आहाजने केली.
4 उंचस्थानातील पुजास्थळे, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली त्याने यज्ञ केले, धूप जाळला.
5 अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरुशलेमवर स्वारी करुन आले. रसीन आणि पेकह यांनी आहाजला घेरले. पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत.
6 अरामचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला. तेथून त्याने सर्व यहुद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक त्याठिकाणी स्थायिक झाले. अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
7 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास आहे, तुझ्या मुलासारखाच आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करुन आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला ये आणि मला वाचव.” यहूदाचा राजा आहाज
8 आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.
9 अश्शूरच्या राजानेही आहाजच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि दिमिष्कावर स्वारी केली. दिमिष्क सर करुन तेथील लोकांना त्याने कीर येथे पकडून नेले. रसीनलाही त्याने ठार केले.
10 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेथील वेदी त्याने पाहिली. तेव्हा तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला.
11 दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याबरहुकूम उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.
12 राजाने दिमिष्काहून येताच वेदी पाहिली. तिच्यावर यज्ञ अर्पण केला.
13 होमार्पण आणि धान्यार्पणही केले. पेयार्पण केले तसेच शांतिअर्पणाचे रक्तही वेदीवर शिंपडले.
14 आत्ताची वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामध्ये परमेश्वरासमोर जी पितळी वेदी होती ती आहाजने तिथून हलवली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली.
15 मग उरीया याजकाला त्याने आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे धान्यार्पण, देशातील सर्व लोकांचे पेयार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्या साठी असावी.”
16 उरीया याजकाने राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.
17 आहाजने मग बैठकी कापून त्याचे नक्षीदार कठडे काढून टाकले. बैठकींची स्नान पात्रे काढून टाकली. पितळी बैलांवरचा हौद काढून तो खाली फरसबंदीवर ठेवला.
18 शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशद्वारही आहाजने काढून टाकले. परमेश्वराच्या मंदिरातून हे सर्व काढून त्याने अश्शूरच्या राजाला दिले.
19 ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत.
20 आहाजच्या निधनानंतर त्याचे दावीदनगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.
×

Alert

×