1
|
दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे: |
2
|
आसाफाच्या कुटुंबातून जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला. दावीदाने आसाफला संदेश कथनासाठी निवडले आणि आसाफने आपल्या या मुलांना. |
3
|
यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे. |
4
|
सेवा करायला हेमानचे वंशज होते ते असे बुक्कीया: मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ. |
5
|
हे सर्व हेमानचे मुलगे. हेमान हा राजा दावीदाचा द्रष्टा होता. देवाने हेमानला वंशवृध्दीचे वचन दिले होते. त्यानुसार हेमानला भरपूर मुलेबाळे झाली. देवाने हेमानला चौदा मुलगे आणि तीन मुली दिल्या. |
6
|
परमेश्वराच्या मंदिरात गीते गाण्यासाठी हेमानने आपल्या सर्व मुलांना हाताशी धरले. ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवत, आणि देवाची सेवा करत. राजा दावीदाने यांना निवडले होते. |
7
|
लेवी घराण्यातील हे लोक आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत निपुण होते. परमेश्वराची स्तुती गीते गाणारी अशी 288 माणसे होती. |
8
|
प्रत्येकाने कोणते काम करायचे हे ठरवायला चिठ्ठया टाकल्या जात. त्यांना एकसारखीच वागणूक मिळे. लहान थोर, गुरु-शिष्य असा त्यांच्यात भेदभाव नव्हता. |
9
|
पहिली चिठ्ठी आसाफ (योसेफ) याची निघाली. त्यांची मुले आणि नातलग यांच्यातून बारा जणांची निवड झाली.दुसरी गादल्याची त्याची मुले आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले. |
10
|
जक्कूरचे मुलगे आणि भाऊबंद यांच्यामधून, तिसऱ्या चिठ्ठीनुसार बाराजण घेतले. |
11
|
चवथी चिठ्ठी इस्त्रीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांच्यामधून बारा. |
12
|
पाचवी नथन्याची. त्याच्या मुलां-नातलगामधून बारा. |
13
|
सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा. |
14
|
सातवी यशरेलाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा. |
15
|
यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा. |
16
|
नववी मत्तन्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा. |
17
|
दहावी शिमोची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा. |
18
|
अकरावी अजरेलाची. त्याचे मुलगे आणि नातलाग यांमधून बारा. |
19
|
बारवी हशब्याची. त्याचे मुलगे आणि त्याचे नातलग यांमधून बारा. |
20
|
तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा. |
21
|
चोदावी मतिथ्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा. |
22
|
पंधरावी यरेमोथची. त्याचे मुलगे आणि नातेवाईक यांमधून बारा. |
23
|
सोळावी हनन्याची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा. |
24
|
सतरावी याश्बाकाशाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा. |
25
|
अठरावी हनानीची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा. |
26
|
एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा. |
27
|
विसावी अलीयाथची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा. |
28
|
एकविसावी होथीरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा. |
29
|
बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा. |
30
|
तेविसावी महजियाथची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा. |
31
|
चोविसावी रोममती एजेरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा. |
1-Chronicles 25:10 Marathi Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...