Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

Books

1 Chronicles Chapters

1 Chronicles 23 Verses

Bible Versions

Books

1 Chronicles Chapters

1 Chronicles 23 Verses

1 आता दावीदाचे बरेच वय झाले होते. तेव्हा त्याने आपला मुलगा शलमोन याला इस्राएलचा राजा केले.
2 इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना दावीदाने बोलावून घेतले.
3 तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. तसे एकंदर 38,000 लेवी होते.
4 दावीद म्हणाला, “यांच्यापैकी 24,000 लेवी परमेश्वरच्या मंदिराच्या कामावर देखरेख करतील. 6,000 अंमलदार आणि न्यायाधीश म्हणून काम करतील.
6 लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार त्याने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.
7 गेर्षोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते.
8 लादान याला तीन मुले. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
9 शिमीचे मुलगे असे शलोमोथ, हजिएल व हरान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
10 शिमीला चार मुलगे. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
11 यरथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा. यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.
12 कहाथला चार मुलगे होते: अम्राम, इसहार, इब्रोन आणि उज्जियेल.
13 अहरोन आणि मोशे हे अम्रामचे मुलगे: अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
14 मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे मुलगे लेवीच्या वंशातच गणले जात.
15 गेर्षोम आणि अलियेजर हे मोशचे मुलगे.
16 शबुएल हा गेर्षोमचा मोठा मुलगा.
17 रहब्या हा अलियेजरचा मोठा मुलगा. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच मुले झाली.
18 शलोमीथ हा इसहारचा पहिला मुलगा.
19 हेब्रोनचे मुलगे याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
20 उज्जियेलचे मुलगे: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
21 महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे. एलाजार आणि कीश हे महलीचे मुलगे.
22 एलाजारला मुलीच झाल्या त्याला पुत्र नव्हता. या मुलींचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशच्या घराण्यात गेल्या.
23 मूशीचे मुलगे: महली, एदर आणि यरेमोथ.
24 हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची शिरगणती झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेवराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम.
25 दावीद म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांना शांती लाभली आहे. परमेश्वर यरुशलेमला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे.
26 तेव्हा लेवींना पवित्र निवासमंडप आणि उपासनेतील इतर उपकरणे सतत बाळगण्याची गरज नाही.”
27 लेवी कुळतील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांना अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या माणसांची शिरगणती झाली.
28 अहरोनच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुचिर्भूत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत.
29 मंदिरातील विशेष भाकरी मेजावर ठेवणे, पीठ, धान्यार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्व काही सिध्द करणे, मोजून मापून त्या वंस्तूची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.
30 ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
31 शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शन आणि सणावाराला देवाची होमार्पणे ते तयार करत. नित्य आराधनाही त्यांच्याकडेच होती. एका वेळी किती लेवींनी हे करायचे याचे नियम घालून दिलेले होते.
32 त्यांना नेमून दिल्याप्रमाणे ते वागत. पवित्र निवासमंडपाची देखभाल करत. पवित्र स्थानाचा संभाळ करत. आपले आप्त. याजक आणि अहरोनचे वंशज यांना ते सहाय्य करत. याजकांना ते परमेश्वरच्या मंदिराच्या सेवेत मदत करत.

1-Chronicles 23:1 Marathi Language Bible Words basic statistical display

COMING SOON ...

×

Alert

×