तांबडे ठिपके असलेले घोडे, त्यांच्या भागात जाण्यास, उत्सुक दिसत होते. म्हणून देवदूताने त्यांना भूमीमधून संचार करण्यास सांगितले मग ते त्यांच्या भागांतून गेले.
मग परमेश्वराने मला मोठ्याने हाक मारुन सांगितले, “बघ, उत्तरेकडे गेलेल्या घोड्यांनी बाबेलमध्ये आपले काम पूर्ण केले आहे. त्यांनी माझा आत्मा शांत केला आहे. मी आता रागावलेलो नाही.”
तो परमेश्वराचे मंदिर बांधून गौरव प्राप्त करील. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. त्याच्या सिंहासनाजवळ याजक उभे राहतील. ते दोघे एकत्रितपणे, शांतपणे काम करतील.’
“लोकांना आठवण राहावी म्हणून ते मुकुट मंदिरात ठेवतील. तो मुकुट हेल्दय, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा योशिया यांना राजाचे सामर्थ्य देवाकडून येते याची आठवण करुन देईल.
दूरवर राहणारे लोक येतील आणि मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठविले. जर तुम्ही परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागलात, तरच ह्या गोष्टी घडून येतील.”