दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हमाला, “धावत जा, आणि त्या तरुणाला सांग की यरुशलेम मोजमाप करण्यापलीकडे होईल. त्याला पुढील गोष्टी सांग: “यरुशलेम ही तटबंदी नसलेली नगरी असेल. कारण तेथे खूप माणसांचे व प्राण्यांचे वास्तव्य असेल.’
तुम्ही सियोनवासी बाबेलचे कैदी आहात. पण आता निसटा! त्या नगरातून दूर पळा!” सर्व शक्तिमान परमेश्वर माझ्याविषयी असे म्हणाला, की त्याने तुमची लूट करणाऱ्या मला पाठवले. तुम्हाला मान मिळावा म्हणून त्याने मला पाठवले.
बाबेलच्या लोकांनी माझ्या लोकांना कैदी म्हणून पकडून नेले. आणि त्यांना गुलाम बनवले. पण मी त्यांचा पराभव करीन आणि ते माझ्या लोकांचे गुलाम होतील. तेव्हा तुम्हाला पटेल की सर्वशक्तिमान परमेश्वराने मला पाठविले आहे.”
त्या वेळी पुष्कळ राष्ट्रांमधील लोक माझ्याकडे येतील. ती माझी माणसे होतील. मी तुझ्या नगरीत राहीन.” मग मला सर्व शक्तिमान परमेश्वराने पाठविले असल्याचे तुला समजेल.