English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Revelation Chapters

Revelation 2 Verses

1 “इफिस येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोनेरी दीपसमयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत:
2 तू काय करतोस ते मला माहीत आहे. तू खूप काम करतोस व धीर धरतोस हे मला माहीत आहे. मला हे माहीत आहे की दुष्ट मनुष्यांचा तू स्वीकार करीत नाहीस आणि जे स्वत:ला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची कसोटी तू घेतलेली आहेस आणि ते खोटे आहेत हे तुला समजले आहे.
3 माइया नावासाठी तू धीर धरलास, माइया नावामुळे तू दु:ख सोसलेस आहे आणि तू थकला नाहीस.
4 “तरीही तुइयाविरुद्ध माझे म्हणणे आहे: तू तुझी पहिली प्रीति सोडली आहेस.
5 ज्या उंचीवरुन तू पडलास ते लक्षात आण! पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी दीपसमई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
6 पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करितो.
7 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे (फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.
8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला.
9 मला तुमचे क्लेश आणि गरीबी माहीत आहे. तरीही तुम्ही श्रीमंत आहात! ज्या वाईट गाष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत.
10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.
11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही.
12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,
13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्येसुद्धा माइयावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझा विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे.
14 “तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले.
15 त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्येसुद्धा काहीजण आहेत.
16 म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.
17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल.
18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: “देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या पितळासारखे आहेत.
19 मला तुमची कामे, तुमचे प्रेम आणि विश्वास, तुमची सेवा आणि धीर माहीत आहे. आणि तुम्ही पहिल्यापेक्षा आता जास्त करीत आहात हे माहीत आहे.
20 तरीसुद्धा तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: इजबेल नावाची स्त्री जी स्वत:ला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या सेवकांना अनैतिक लैंगिक पाप व मूर्तीसमोर ठेवलेले अन्न खावयास मोहविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करु देता.
21 मी तिला तिच्या अनैतिक लेंगिक पापाविषयी पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे. परंतु ती तसे करायला तयार नाही.
22 म्हणून मी तिला दु:खाच्या बिछान्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दु:ख भोगावयास लावीन. जर ती तिच्या मार्गापासून पश्र्चात्ताप पावली नाही
23 तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंत:करणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचा मोबदला देईन.
24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आजरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्या तुम्ही सैतानाची म्हणाविलेली खोल गुपिते जाणली नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.
25 मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्याला धरुन राहा.
26 “जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे करतो त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
27 ‘तो त्यांच्यावर लोहदंडाने अधिकार गाजवील मातीच्या भांड्यासारखा तो त्यांचा चुराडा करील.’ स्तोत्र. 2:9 जसा पित्याकडून मला अधिकार प्राप्त झाला आहे,
28 तसा मीसुद्धा त्याला पहाटेचा तारा देईन.
29 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
×

Alert

×