Indian Language Bible Word Collections
Psalms 50:15
Psalms Chapters
Psalms 50 Verses
Books
Old Testament
New Testament
Bible Versions
English
Tamil
Hebrew
Greek
Malayalam
Hindi
Telugu
Kannada
Gujarati
Punjabi
Urdu
Bengali
Oriya
Marathi
Assamese
Books
Old Testament
New Testament
Psalms Chapters
Psalms 50 Verses
1
परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे. तो पृथ्वीवरील पूर्व पाश्चिमे कडील सर्व लोकांना बोलावतो.
2
सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
3
आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही. त्याच्यासमोर आग लागली आहे. त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4
आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
5
देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.”
6
देव न्यायाधीश आहे आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.
7
देव म्हणतो, “माझ्या लोकांने माझे ऐका! इस्राएलाच्या लोकांनो मी तुमच्या विरुध्द माझा पुरावा देईन. मी देव आहे. तुमचा देव आहे.
8
मी तुमच्या होमबलीं बद्दल तक्रार करीत नाही. इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा. तुम्ही मला ती रोज द्या.
9
मी तुमच्या घरातून बैल घेणार नाही. मी तुमच्या गोठ्यातून बकऱ्या घेणार नाही.
10
मला त्या प्राण्यांची गरज नाही. जंगलातले सगळे प्राणी आधीच माझ्या मालकीचे आहेत हजारो पर्वातावरील सगळे प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.
11
उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहीत आहे डोंगरावर हलणारी प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
12
मी भुकेला नाही मी जरी भुकेला असतो तरी तुमच्याकडे अन्न मागितले नसते. मी जगाचा मालक आहे आणि जगातील प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची आहे.
13
मी बैलाचे मांस खात नाही. मी बकऱ्यांचे रक्त पीत नाही.”
14
म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.
15
देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
16
देव दुष्ट लोकांना म्हणतो, “तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता. तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
17
मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
18
तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर राहाण्यासाठी तुम्ही पळत सुटता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर झोपता.
19
तुम्ही वाईट गोष्टी सांगता आणि खोटे बोलता.
20
तुम्ही इतरांविषयी सतत वाईट बोलता. स्व:तच्या भावाविषय़ी सुध्दा!
21
तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही. आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते. पण मी मुळीच गप्प बसणार नाही. मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
22
तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हाला फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.
23
म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”