English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Psalms Chapters

Psalms 36 Verses

1 वाईट माणूस जेव्हा असे म्हणतो “मी देवाला भिणार नाही, त्याला मान देणार नाही” तेव्हा तो फार वाईट गोष्ट करतो.
2 तो माणूस स्वतशीच खोटे बोलतो त्याला स्वतच्या चुका दिसत नाहीत म्हणून तो क्षमेची याचना करीत नाही.
3 त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही.
4 सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो. तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही. परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही.
5 परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे. तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे.
6 परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
7 तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
8 परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
9 परमेश्वरा जीवनाचे कारंजे तुझ्यातून उडते. तुझा प्रकाश आम्हाला प्रकाश दाखवतो.
10 परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे.
11 परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.
12 त्याच्यां थडग्यावर “हथे वाईट लोक पडले, त्यांना चिरडण्यात आले, ते आता पुन्हा कधीही उभे राहू शकणार नाहीत.” असे लिहून ठेव.
×

Alert

×