परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
जर त्या माणसाने कोणाला पैसे दिले असतील तर तो कर्जावर व्याज आकारत नाही. आणि तो निरपराध लोकांना त्रास देण्यासाठी पैसे घेणार नाही. जर कोणी त्या चांगल्या माणसाप्रमाणे वागला तर तो नेहमी देवाच्या जवळ राहील. नावाचे स्तोत्र
तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.