English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Proverbs Chapters

Proverbs 26 Verses

1 उन्हाळ्यात बर्फ पडायला नको आणि पीक कापणीच्यावेळी पाऊस पडायला नको असतो. त्याचप्रमाणे लोकांनी मूर्खांचा आदर करायला नको.
2 एखाद्याने तुमच्या बाबतीत काही वाईट घडावे असे म्हटले तर काही काळजी करु नका. तुम्ही जर काही चूक केली नसेल तर काहीच वाईट घडणार नाही. अशा माणसाचे शब्द तुमच्या जवळून उडून जाणाऱ्या व कधीच न थांबणाऱ्या पक्ष्याप्रमाणे असतात.
3 घोड्याला चाबकाचे फटकारे लागतात. बैलाच्या नाकात वेसण घालावी लागते आणि मूर्खाला खरपूस मार द्यावा लागतो.
4 एक वाईट परिस्थिती: मूर्खाने जर तुम्हाला मूर्खासारखा प्रश्र विचारला तर मूर्खासारखे उत्तर देऊ नका. नाहीतर तुम्ही सुध्दा मूर्खासारखेच दिसाल.
5 पण मूर्खाने जर मूर्ख प्रश्र विचारला तर तुम्हीही त्याला मूर्ख उत्तर द्या. नाहीतर तो मूर्ख आपण खूप हुशार आहोत असे समजेल.
6 तुमचा निरोप द्यायला मूर्खाला कधीही सांगू नका. तुम्ही जर तसे केलेत तर ते तुमचे पाय कापून टाकल्यासारखे होईल. संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
7 मूर्ख जेव्हा शहाण्यासारखे बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा ते लंगड्याने प्रयत्न केल्यासारखे वाटते.
8 मूर्खाला आदर दाखवणे हे गोफणीला दगड बांधण्यासारखे आहे.
9 मूर्ख जेव्हा काहीतरी शहाणपणाचे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते झिंगलेल्या माणसाने हातात रुतलेला काटा काढण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते.
10 मूर्खाला किंवा वाटेवरच्या कोणालाही मोलाने काम करायला सांगणे धोकादायक असू शकते. त्यामुळे कोणाला इजा होईल ते सांगता येणार नाही.
11 कुत्रा अन्न खातो. नंतर त्याला बरे वाटेनासे होते आणि तो उलटी करतो. कुत्रा नंतरही ते ओकलेले पुन्हा खातो. मूर्ख माणूसही असाच असतो. तो मूर्खांसारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
12 जर एखादा माणूस शहाणा नसताना स्वत:ला शहाणा समजत असेल तर तो मूर्खापेक्षाही वाईट आहे.
13 आळशी माणूस म्हणतो, “मी माझे घर सोडू शकत नाही. रस्त्यात सिंह आहे.”
14 आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.
15 आळशी माणूस स्वत:चे अन्न उचलून तोंडात घालण्यातदेखील आळशीपणा करतो.
16 आळश्याला आपण खूप हुशार आहोत असे वाटते. सात माणसे त्यांच्या कल्पनांसाठी योग्य कारणे देऊ शकतात. त्यांच्यापेक्षाही आपण हुशार आहोत असे त्याला वाटते.
17 दोन माणसांच्या वादातला भाग बनणे हे फार धोकादायक असते. ते रसत्याने चालताना कुत्र्याला त्याचे कान धरुन पकडण्यासारखेच असते.
18 [This verse may not be a part of this translation]
19 [This verse may not be a part of this translation]
20 शेकोटीत जर लाकडे नसतील तर ती शेकोटी विझून जाते. त्याचप्रमाणे अफवा नसतील तर वाद संपून जातात.
21 लोणारी कोळसा कोळश्याला पेटता ठेवतो आणि लाकूड शेकोटी पेटती ठेवते. त्याचप्रमाणे जे लोक संकटे निर्माण करतात तेच वाद चालू ठेवतात.
22 लोकांना गप्पा-टप्पा आवडतात. ते चांगले अन्न खाल्ल्यासारखे असेत.
23 दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते.
24 दुष्ट मनुष्य आपल्या बोलण्याने चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या दुष्ट योजना आपल्या मनात लपवण्याचा प्रयत्न करतो.
25 तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे.
26 तो त्याच्या दुष्ट योजना चांगल्या शब्दांनी लपवतो. पण तो फारच नीच असतो आणि शेवटी तो ज्या वाईट गोष्टी करतो त्या सर्वांना दिसतील.
27 जर एखाद्याने दुसऱ्याला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला तर तो स्वत:च त्यात अडकतो जर एखाद्याने दुसऱ्यावर दरड टाकण्याचा प्रयत्न केला तर तो स्वत:च त्या दरडीखाली चिरडून जाईल.
28 जो माणूस खोटे बोलून ज्या लोकांना दु:ख देतो त्यांचा तो तिरस्कार करीत असतो. आणि तो जर त्याच्या मनात नसताना काही बोलला तर तो स्वत:लाच दु:खी करीत असतो.
×

Alert

×