त्यांनी जेथे जेथे प्रवास केला त्याबद्दल मोशेने लिहिले आहे. परमेश्वराला जे हवे होते तेच मोशेने लिहिले. ते ज्या ठिकाणी गेले ती ठिकाणे आणि तेथून ते कधी गेले त्या वेळा या प्रमाणे:
पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करुन बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
याजक अहरोनने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांच्यापासून तुम्ही तो प्रदेश घ्याल. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
तुमच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीचा काही भाग मिळेल. तुम्ही चिठ्ठया टाकून कोणाला कुठली जमीन मिळते ते ठरवाल. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. चिठ्यां कुठल्या कुळाला कुठली जमीन मिळाली ते कळेल. प्रत्येक कुळाला त्याचा स्वत:चा जमिनीचा तुकडा मिळेल.
“तुम्ही त्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढा, जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुमच्यावर अनेक संकटे आणतील. ते तुमच्या डोव्व्यातील कुसळासारखे आणि शरीरातल्या काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.