तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. वेशींवर पहारा करायला माणसे नेमली. मंदिरात गायनाला आणि याजकांना मदत करायला माणसे नेमून दिली.
यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गिढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. हनानीची निवड मी केली कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
नंतर हनानी आणि हनन्या यांना मी म्हणालो, “सूर्य चांगला वर येऊन ऊन तापल्यावरच तुम्ही रोज वेशीचे दरवाजे उघडा आणि सूर्यास्तापूर्वीच दरवाजे लावून घ्या. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळयात आधी परत आले त्यांच्या वंशवळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:
बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दमानी, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:
काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. याजक म्हणून काम करता यावे यासाठी आपण याजकांचेच पूर्वज आहोत हे काही त्यांना सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांना याजक म्हणून सेवा करता आली नाही. त्यांची नावे याजकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली नाहीत.
अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत त्यांनी या अन्नातले काही खायचे नव्हते.
घराण्यांच्या काही प्रमुखानी कामाला हातभार म्हणून पैसे दिले. राज्यपालने एकोणिस पौंड सोने भांडाराला दिले. शिवाय पन्नास वाडगे आणि याजकांसाठी 530 वस्त्रे दिली.
अशाप्रकारे याजक, लेवींच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.