यहुदाच्या प्रदेशात परत आलेले याजक व लेवी पुढीलप्रमाणे: शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते आले. त्यांच्या नावांची यादी अशी: सराया, यिर्मया, एज्रा,
एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या दिवसात ज्या लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत.
लेव्यांचे प्रमुख असे होते: हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा मुलगा येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी हे भाऊ त्यांच्या पलीकडे उभे राहात. एक समूह दुसऱ्या समूहाला प्रत्युत्तर करी. देवाचा माणूस दावीद याची तशीच आज्ञा होती.
हे द्वारपाल योचाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा मुलगा आणि येशूवा योसादाकचा. नहेम्या हा राज्यपाल आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात हे द्वारपाल होते.
यरुशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी अर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुशलेमला एकत्र आणले. यरुशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
यहुदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले. देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातल्या एका गटाने राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडच्या भिंतीच्या वर जावयाचे होते.
आसाफचे भाऊ म्हणजे शमया, अजरेल, मिललई, गिललइ, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा माणूस दावीद याने केली होती. भिंत अर्पण करण्यासाठी जो लोकांचा गट आलेला होता त्यांना एज्रा हा लेखक पुढे घेऊन गेला.
झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटंबैदीच्या भिंतीवर ते होते. दावीदच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.
गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले.
मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमची वेस जुनी वेस, मत्स्य वेस. हनानेलचा दुर्ग आणि शतकाचा दुर्ग यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन ते पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले
मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्र ह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.
या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले. सर्वजण अतिशय आनंदात होते. देवाने सर्वांना आनंदित केले होते. बायका आणि मुलेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांनाही यरुशलेममधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
त्यादिवशी कोठारांवरील लोकांच्या नेमणुका केल्या आपल्या झाडांची पहिली फळे वहिली आणि धान्यातला एकदशांश वाटा लोक घेऊन आले. कोठारप्रमुखांनी या वस्तू कोठारात ठेवल्या. सेवेत असलेले याजक व लेवी यांच्याबद्दल यहुद्यांना अतिशय समाधान होते. म्हणून त्यांनी कोठारात ठेवायला पुष्कळशा गोष्टी आणून दिल्या.
याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुध्दीकरणाचे विधी त्यांनी पार पाडले. गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेबरहुकूम त्यांनी सर्व यथसांग केले.
अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळांत समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही रक्कम बाजूला ठेवली. आणि अहरोनच्या वंशजांसाठी (म्हणजेच याजकांसाठी) लेव्यांनी पैसे वेगळे ठेवले.