English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Luke Chapters

Luke 9 Verses

1 येशूने बारा शिष्यांना एकत्र बोलाविले, आणि त्याने त्यांना सर्व भुतांवर सामर्थ्य व अधिकार दिला. आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले.
2 नंतर त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठविले.
3 तो त्यांना म्हणाल, “तुमच्या प्रवासासाठी बरोबर काठी, पिशवी, भाकरी, चांदीची नाणी, दोन-दोन अंगरखे असे काहीही घेऊ नका.
4 आणि ज्या घरात तुम्ही जाल त्या घरातच तुम्ही राहा. व दुसऱ्या गावाला जाताना ते घर सोडा.
5 जेथे लोक तुमचे स्वागत करणार नाहीत, तेथे गाव सोडताना त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून आपल्या पायावरील धूळ झटकून टाका.”
6 ते निघाल्यानंतर सर्व गावातून सुवार्ता सांगत व लोकांचे रोग बरे करीत गेले.
7 जेव्हा हेरोद राच्यापालाने जे सर्व काही घडत होते त्याविषयी ऐकले, तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही जणांनी असे म्हटले की, “योहान मेलेल्यांतून उठविला गेला आहे.”
8 इतर काही जण असे म्हणत होते की, “एलीया पुन्हा आला आहे.” इतर काही जणांनी असे सांगितले की, “फार पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक जण मेलेल्यांतून पुन्हा जिवंत झाला आहे.”
9 [This verse may not be a part of this translation]
10 शिष्य परत आले तेव्हा त्यांनी येशूला आपण केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर येशू त्यांना घेऊन बेथसैदा नावाच्या नगरास गुप्तपणे गेला.
11 पण लोकसमुदायाला हे कळले व ते त्याच्यामागे गेले. त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना स्वर्गराज्याविषयी सांगितले. ज्यांना बरे होण्याची आवश्यकता होती, त्यांना त्याने बरे केले.
12 दिवस मावळत असता प्रेषित त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना जाऊ द्या. म्हणजे ते आजूबाजूच्या शेतात आणि खेड्यात जातील व त्यांना खावयाला व राहण्यास मिळण्याची शक्यता आहे का ते पाहतील. कारण आपण दूर ठिकाणी आहेत.”
13 पण तो त्यांना म्हणाला, “तुम्ही त्यांना काही खावयास द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत घ्यावे असे तुम्हांला वाटते काय? आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे याशिवाय काही नाही.”
14 तेथे ते सुमारे पाच हजार पुरुष होते. परंतु तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “त्यांना सुमारे पन्नासाच्या गटाने बसवा.”
15 त्यांनी तसे केले व सर्वांना खाली बसविले.
16 नंतर त्याने पाच भाकरी व दोन मासे घेतले, मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी व मासे याबद्दल देवाचे उपकार मानले. त्याचे तुकडे केले. नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले.
17 लोक जेवले व सर्व तृप्त झाले. आणि जेवून झाल्यानंतर उरलेले गोळा करण्यात आले तेव्हा त्या तुकड्यांच्या बारा टोेपल्या भरल्या.
18 मग असे झाले की एकदा येशू एकटाच प्रार्थना करीत असताना, त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे याबद्दल लोक काय म्हणतात?”
19 ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहान, इतर काही एलीया आणि काहीजण म्हणतात की, फार पूर्वी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांपैकी कोणी तरी उठला आहे.”
20 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”
21 तेव्हा ताकीद देऊन त्याने त्यांना सूचना दिली की, हे कोणालाही सांगू नका.
22 येशू म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ दु:ख सोसणे आवाश्यक आहे, आणि वडिलांनी, मुख्य याजकांनी, नियमशास्त्राचे शिक्षक यांनी नाकारावे व त्यांच्याकडून मारले जावे व पुन्हा तिसऱ्या दिवशी उठावे हे आवश्यक आहे.”
23 नंतर तो त्या सर्वांना म्हणाला, “जर कोणा व्यक्तीला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वत:ला नाकारले पाहिजे. व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून माझ्या मागे आले पाहिजे.
24 जो कोणी स्वत:चा जीव वाचवू पाहतो, तो त्याला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी जिवाला मुकेल तो त्याला बाचवील.
25 कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वत:चा नाश करुन घेतला किंवा स्वत:ला गमाविले तर त्याला काय लाभ?
26 जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या वैभवाने, पित्याच्या आणि पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तोही त्याची लाज धरील.
27 परंतु मी तुम्हांला खरे सांगतो येथे उभे राहिलेल्यांमध्ये असे काही आहेत की, स्वार्गाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
28 मग असे झाले की, तो असे बोलल्यावर साधारणपणे आठ दिवसांनंतर, आपल्याबरोबर पेत्र, योहान व याकोब यांना घेऊन डोंगरावर प्रार्थना करण्यास गेला.
29 मग असे घडले की, तो प्रार्थना करीत असताना त्याच्या चेहऱ्याचे रुप पालटले व त्याचे कपडे डोळे दिपविण्याएवढे पांढरेशुभ्र झाले.
30 आणि तेथे दोघे जण त्याच्याबरोबर बोलत होते. ते एलीया व मोशे होते. ते गौरवामध्ये प्रगट झाले होते,
31 आणि ते येशूच्या मरणाविषयी, जे तो यरुशलेमामध्ये पूर्ण करणार होता, त्याविषयी बोलत होते.
32 पण पेत्र व त्याच्याबरोबर असलेले सर्व झोपी गेले होते, जेव्हा ते जागे झाले, त्यांनी येशूचे गौरव पाहिले, आणि दोन मनुष्यांना त्याच्याबरोबर उभे असलेले पाहिले.
33 मग असे झाले की, ते दोघे जण येशूपासून विभक्त होत असताना, पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही येथे आहोत ते चांगले झाले. आपण तीन मंडप तयार करु या, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” (तो काय बोलत होता हे त्याचे त्याला कळत नव्हते.)
34 पण तो या गोष्टी सांगत असता एक मेघ खाली आला आणि त्याने छायेने झाकून टाकले. त्यांनी मेघामध्ये प्रवेश केल्यानंतर ते घाबरले.
35 आणि त्यानां वेढलेल्या ढगातून एक वाणी ऐकू आली; ती म्हणाली, “हा माझा पुत्र आहे; तो माझा निवडलेला आहे, त्याचे ऐका.”
36 जेव्हा वाणी झाली तेव्हा येशू एकटाच तेथे होता. आणि याविषयी ते गप्प राहिले. त्यांनी त्यावेळी जे काही पाहिले होते त्याविषयी कोणालाही काही सांगितले नाही.
37 नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की, जेव्हा ते डोंगरावरुन खाली आले तेव्हा मोठा जमाव येशूला भेटण्यासाठी आला.
38 आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी तुम्हांला विनंति करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे.
39 एकाएकी त्याला अशुद्ध आत्मा धरतो व तो अचानक किंचाळतो, आणि तो त्याला झटके देईपर्यंत पिळतो, त्यामुळे त्याच्या तोंडाला फेस येतो, तो त्याला सोडीत नाही व त्याला गलितगात्र करतो.
40 मी तुमच्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढण्याची विनंति केली, पण त्यांना ते शक्य झाले नाही.”
41 “येशू म्हणाला अहो, अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो! मी तुमच्याबरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू? त्या मुलाला इकडे आणा.”
42 परंतु तो येत असतानाच भुताने त्याला पाडले आणि पिळवटले. येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले. त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले.
43 देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले. पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला.
44 “मी तुमच्याजवळ ज्या गोष्टी सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्षा द्या. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती देण्यात येईल.”
45 पण शिष्यांना त्याचे बोलणे समजले नाही. ते त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. यासाठी की ते त्यांना समजू नये. आणि या बोलण्याविषयी त्याला विचारण्याची त्यांना भीति वाटत होती.
46 आपणांमध्ये सर्वांत मोठा कोण असा शिष्यांमध्ये वाद सुरु झाला.
47 पण येशूला त्यांच्या मनातले विचार समजले, तेव्हा त्याने एका लहान बालकाला घेतले व त्याच्याजवळ त्याला उभे केले.
48 येशू त्यानां म्हणाला, “जो कोणी ह्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. कारण जो कोणी तुम्हा मध्ये सर्वांत लहान बनेल तो सर्वांत मोठा आहे.”
49 परंतु योहानाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही कोणाला तरी तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, व आम्ही त्याला मना केले, कारण आम्ही जे तुम्हांला अनुसरतो त्यापैकी तो नाही.”
50 परंतु येशू योहानाला म्हणाला, “त्याला मना करु नका, कारण जो तुमच्याविरुद्ध नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”
51 आता असे घडले की, जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली, त्याने यरुशलेमाला जाण्याचे ठरविले.
52 त्याने आपणांपुढे निरोपे पाठविले. ते गेले आणि येशूच्या येण्याविषयीच्या तयारीसाठी एका शोमरोनी खेड्यात गेले.
53 पण शोमरोन्यांनी येशूचा स्वीकार केला नाही, कारण तो यरुशलेमाकडे निघाला होता.
54 जेव्हा याकोब व योहान या शिष्यांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “प्रभु, स्वर्गातील अग्नीने येऊन त्यांचा नाश करावा यासाठी आम्ही आज्ञा करावी असे तुला वाटते काय?”
55 तेव्हा त्याने वळून त्यांना धमकावले.
56 आणि ते दुसऱ्या खेड्यात निघून गेले.
57 ते रस्त्याने चातल जात असता कोणी तरी त्याला म्हणाले, “तू जेथे कोठे जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”
58 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आहेत, आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकेसुध्दा टेकावयास जागा नाही.”
59 तो दुसऱ्या एकाला म्हणाला, “माझ्यामागे ये.” पण तो मनुष्य म्हणाला, “पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरु दे.”
60 पण येशू त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरु दे. तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर.”
61 दुसरा म्हणाला, “मी तुला अनुसरेन, प्रभु पण अगोदर मला माझ्या घरातील लोकांचा निरोप घेऊ दे.”
62 पण येशू त्यांस म्हणाला, “जोे कोणी नांगराला हात घालतो व मागे पाहतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”
×

Alert

×