शखेम नगरातील वडीलधाऱ्यांना विचारा की, यरुब्बालच्या सत्तर मुलांच्या सत्तेखाली राहणे चांगले की एकाच माणसाच्या आधिपत्याखाली असणे चांगले? मी तुमचा नातेवाईक आहे हे लक्षात ठेवा.”
अबीमलेखच्या मामांनी शखेम नगरातील अधिकारी मंडळींना हा प्रश्न विचारला. त्यांनीही अबीमलेखला आपला पाठिंबा द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “हा तर आमचा बंधू आहे.”
शखेमच्या या अधिकाऱ्यांनी बआल-बेरीथच्या मंदिरातून सत्तर रौप्यमुद्रा अबीमलेखला दिल्या. त्यातून अबीमलेखने काही रिकामटेकडी कसलाही मुलाहिजा नसलेली माणसे आपल्या पदरी बाळगली. ती सतत अबीमलेख बरोबर राहात असत.
अबीमलेख अफ्रा येथे आपल्या वडीलांच्या गावी आला व त्याने आपल्या सत्तर भावांची एकाचवेळी कत्तल केली. फक्त त्यातला सगव्व्यात धाकटा लपून बसल्यामुळे बचावला. त्याचे नाव योथाम होते.
हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला. “शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेले.”
ते काटेरी झुडूप त्यांना म्हणाले, “तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुडुपातून आग्नि निघून तो लबानोनचे गंधसरु भस्मसात करील.”
“आता, अबीमलेखला आपला राजा म्हणून घोषित करताना तुम्ही पूर्णपणे प्रमाणिक राहिला असलात तर त्याच्या कारकीर्दीत सुखात असा. यरुब्बाल आणि त्याचे कुटुंबीय यांच्याशी तुमचे वर्तन योग्य असेल तर ठीकच आहे.
पण आता तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठ फिरवली आहे. तुम्ही माझ्या वडालांच्या सतर मुलांना एकाच वेळी ठार केले आहे. अबीमलेखला तुम्ही शखेमचा राजा केले आहे. तो तुमचा नातेवाईक म्हणून तुम्ही असे केलेत पण तो निव्वळ दासीपुत्र आहे.
एक दिवस शखेममधील लोक द्राक्ष खुडणीसाठी मव्व्यामध्ये गेले. त्यांनी द्राक्षरस काढला आणि त्यांच्या दैवतांच्या देवळात उत्सव केला. खाद्यपेयांची मेजवानी केली आणि अबीमलेखला शिव्याशाप दिले.
तेव्हा एबेदपुत्र गाल म्हणाला, “आपण शखेमचे लोक आपण त्याच्या राजवटीत का राहावे? तो कोण समजतो स्वत:ला? यरुब्बालच्या मुलांपैकी तो एक, बरोबर? जबूलला अबीमलेखने अधिकारी केले आहे. खरे ना?आपण अबीमलेखला जुमानता कामा नये. आपण आपल्याच लोकांचे हमोरच्या लोकांचे ऐकले पाहिजे. (हमोर हा शखेमचा मूळ पुरुष)
त्याने अरुमा येथे दूत पाठवून अबीमलेखला हे वर्तमान पोचवले. तो संदेश असा: एबेदाचा मुलगा गाल आणि त्याचे भाऊबंद शखेम शहरात येऊन राहिले आहेत. ते तुला त्रास देण्यासाठी कारस्थान करत आहेत. त्यांनी सगव्व्या शहरवासियांना तुझ्याविरुद्ध फितवले आहे.
गालने ते पाहिले व तो जबूलला म्हणाला, “ते पाहा डोंगरमाथ्यावरुन लोक उतरत आहेत.” जबूल त्याला म्हणाला, “तू पाहातोस त्या डोंगराच्या सावल्या आहेत त्या तुला माणसांसारख्या वाटत आहेत.”
पण गाल पुम्हा म्हणाला, “ती पाहा तिकडून काही माणसे प्रदेशाची नाभी नानक जागा उतरुन येत आहेत. आणि जादूगाराच्या वृक्षाजवळही कोणाचे तरी डोके मी पाहिले आहे.”
तेव्हा जबूल गालला म्हणाला, “मग आता तुझे बढाया मारणे कुठे गेले? “अबीमलेख कोण? आम्ही त्याचे का ऐकावे’ असे तू म्हणत होतास नाही का? त्यांना तू हसण्यावारी नेलेस. आता आणि त्यांचा सामना कर.”
त्याने आपल्या सैन्याच्या तीन तुकडचा केल्या. शखेमच्या लोकांवर त्याला गनिमी काव्याने हल्ला करायचा होता म्हणून त्याने आपल्या सैन्याला शेतात दबा धरून बसायला सांगितले. लोक गावातून शेतावर जायला निघतात तोच त्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.
तेव्हा तो आपल्या माणसांना घेऊन सलमोन डोंगरावर गेला. तेथे त्याने कुऱ्हाडीने झाडांच्या काही फांद्या छाटल्या. त्या फांद्या खांद्यावर घेतल्या. बरोबरच्या लोकांनाही त्याने वेळ न दवडता तसेच करायला सांगितले.
तेव्हा त्यांनीही फांद्या तोडून घेतल्या व अबीमलेखच्या पाठोपाठ ते चालू लागले. एल-बरीथच्या तळघरासमोर त्या रचून ठेवल्या मग त्यांनी त्या ढिगाला आग लावली. त्या आगीत आतील सर्व माणसे जळून खाक झाली. शखेमच्या मनोऱ्याजवळ राहाणारी बायकापुरुष मिळून जवळ जवळ हजार माणसे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
पण त्या नगराच्या आत एक मजबूत गढी होती. तिच्यात नगरातील बायका, पुरुष, अधिकारी आश्रयाला गेले. आत जाताच त्यांनी दरवाजा पक्का बंद केला. मग ते गढीच्या छतावर चढून बसले.
अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढड्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला ठार कर “एका बाईने” अबीमलेखला मारले असे लोकांनी म्हणता कामा नये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहून नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख मरण पावला.