मी, सर्व राष्ट्रांनासुध्दा गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन. त्या राष्ट्रांनी माझ्या माणसांना म्हणजेच इस्राएल लोकांना पांगविले. त्यानी त्याना बळजबरीने इतर राष्ट्रात राहण्यास भाग पाडले म्हणून त्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला.
“सारे, सीदोन व पेलेशेथच्या सर्व प्रांतानो, माझ्या दृष्टीने तुम्हाला अजिबात महत्व नाही. माझ्या कृत्याबद्दल तुम्ही मला शिक्षा करीत आहत का? तुम्हाला कदाचित् तसे वाटत असेल. पण लवकरच मी तुम्हाला शिक्षा करीन.
परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश व पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
“मगय तुम्हाला कळेल की मीच तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सियोनावर मी राहतो. यरुशलेम पवित्र होईल. त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत.
त्या दिवशी, पर्वत गोड द्राक्षरसाने पाझरतील, टेकड्यांवरून दूध वाहील, आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील, परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.