बाबेलोनबद्दल (समुद्राजवळचे वाळवंट) देवाचा शोक संदेश. वाळवंटातून काहीतरी येत आहे. नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे. भयंकर देशातून ते येत आहे.
काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे. विश्वासघातकी तुझ्याविरूध्द जाताना मला दिसत आहे. लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय, एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर. मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर. त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.
भयंकर गोष्टी पाहून मी घाबरलो आहे. भीतीने माझ्या पोटात गोळा उठतो त्या भीतीच्या वेदना प्रसूतिवेदनेप्रमाणे आहेत. जे मी ऐकतो त्याने भयभीत होतो, जे पाहतो त्यामुळे भीतीने माझा थरकाप होतो.
लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे. लोक म्हणत आहेत “जेवणाची तयारी करा. खा. प्या.” त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत “टेहळणीदार ठेवा. सेनाधिकाण्यांनो, उठा व ढाली सज्ज करा.”
मग एके दिवशी रखवालदाराने इशारा दिला. सिहंनाद करून रखवालदार म्हणाला, “हे प्रभु! रोज मी टेहळणी बुरूजावरून टेहळणी करीत असतो. रोज रात्री माझा खडा पहारा असतो.
पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या व घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!” नंतर दूत म्हणाला, “बाबेलोनचा पराभव झाला. ते जमीनदोस्त झाले, बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन त्या धुळीला मिळाल्या आहेत.”
0यशया म्हणाला, “माझ्या लोकांनो, सर्वशक्तिमान परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने जे मला ऐकवले, ते मी तुम्हाला सांगितले. खळ्यातील धान्याप्रमाणे तुम्ही झोडपले जाल.”