एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.
परमेश्वर म्हणतो, “माझे इस्राएलशी भांडण आहे. याकोबला त्याच्या कर्मांबद्दल सजा मिळालीच पाहिजे. त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
पण गिलादाच्या लोकांनी पाप केले आहे. तेथे पुष्कळ भयानक मूर्ता आहेत. गिल्गालमध्ये लोक बैलांना बळी अर्पण करतात. त्यांच्या अनेक वेदी आहेत. नांगरलेल्या शेतात ज्याप्रमाणे ढेकळांच्या रांगा असतात, त्याप्रमाणे त्यांच्या वेदींच्या रंगाच्या रांगा आहेत.
पण एफ्राईम परमेश्वराच्या रागास कारणीभूत झाला एफ्राईमने अनेक लोकांना ठार केले. म्हणून त्याला त्याच्या अपराधांबद्दल शिक्षा होईल. त्याचा प्रभू (परमेश्वर) त्याला अपमान सहन करायला लावील.”