देव याकोबाला म्हणाला, “तू बेथेल या नगरात जाऊन राहा; आणि तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना त्या ठिकाणी ज्याने तुला दर्शन दिले त्या ‘एल’ (म्हणजे इस्राएलाचा देव) याची आठवण कर व त्याच देवाची उपासना करण्यासाठी तेथे एक वेदी बांध.”
तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वत:ला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला;
तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या जवळ असलेले सर्व परके देव आणून याकोबाला दिले आणि त्यांनी आपल्या कानातील कुंडलेही काढून दिली; तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नावाच्या नगराजवळील एका एला झाडाच्या खाली पुरुन टाकल्या.
याकोब व त्याची मुले यांनी ठिकाण सोडले. त्या भागात राहाणाऱ्या लोकांना त्याचा पाठलाग करुन त्यांना ठार मारावयास पाहिजे होते परंतु त्यांना फार भीती वाटली म्हणून त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही.
याकोबाने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल बेथेल” असे ठेवले; याकोबाने या जागेसाठी हे नाव निवडले कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना ह्याच जागी प्रथम देवाने त्याला दर्शन दिले होते.
देव याकोबाला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे मी ते बदलतो; तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल’ असे असेल;” आणि म्हणून देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.
देव त्याला म्हणाला, “मी सर्व शक्तिमान देव आहे; तुला भरपूर संतती होवो आणि त्यांची वाढ होऊन त्यांचे एक महान राष्ट्र बनो. तसेच तुझ्यातून इतर राष्ट्रे व राजे निर्माण होवोत;
याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या.
परंतु राहेलीस यावेळी प्रसूती वेदनांचा अतिशय त्रास होत होता; त्याचवेळी राहेलीची सुईण तिची कठीण अवस्था पाहून तिला म्हणाली, “भिऊ नकोस राहेल, तू आणखी एका मुलास जन्म देत आहेस.”
इस्राएल तेथे थोडा काळ राहिला, त्यावेळी रऊबेन, इस्राएलाची म्हणजे आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला या विषयी इस्राएलाने ऐकले तेव्हा तो अतिशय संतापला. याकोब (इस्राएल) यास बारा मुलगे होते.