अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा.
जन्मलेल लहान मुलगा आठ वर्षांचा होईल तेव्हा तू त्याची सुंता करावी; तुझ्या कुटुंबात जन्मलेल्या तसेच दुझ्या दासाच्या किंवा गुलामांच्या कुटुंबात जन्मलेल्या हरएक पुरुषाची सुंता करावी;
अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरुन कायम राहील;
अब्राहामाने देवाला लवून नमन केले, परंतु स्वत:शीच हसून तो म्हणाला, “मी शंभर वर्षांचा आहे; मला मुलगा होणे शक्य नाहीं; आणि सारा नव्वद वर्षांची आहे; तिला मूल होऊ शकणार नाहीं.”
देव म्हणाला, “नाही, मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल; त्याचे नाव तू इसहाक ठेव; मी त्याच्याशी करार करीन; तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंनतर असेल.
“तू मला इश्माएल विषयी विचारलेस ते मी ऐकले; मी त्याला आशीर्वाद देईन; त्याला भरपूर संतती होईल; बारा महान सरदारांचा तो पिता होईल; त्याचे कुटुंब म्हणजे एक मोठे राष्ट्र होईल;
तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल व आपल्या घरी जन्मलेल्या गुलामांना व मोल देऊन विकत घेतलेल्या मुलानां एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातले सर्वपुरुष व मुलगे यांची त्याच दिवशी सुंता करण्यात आली.