म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “ती शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी तुला मृत्युदंड देईन. मृत्यू तुझा पाठलाग करील. लोकांना ठार करण्यात तुला घृणा वाटली नाही. म्हणून मृत्यू तुझा पाठलाग करील.
आणि तो परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तू माझ्या माणसांचा द्वेष केलास. त्यांच्यावर रागावलास, म्हणून मी तुझा तिरस्कार करतो. मी शपथपूर्वक वचन देतो की तू जसे त्यांना दुखावलेस, तशीच शिक्षा मी तुला करीन. मी तुला शिक्षा करुन लोकांना दाखवून देईन की मी त्यांच्या पाठीशी आहे.
मग तुलासुद्धा कळेल की मी तू त्यांना उच्चारलेले सर्व अपमानकारक शब्द ऐकले होते. इस्राएलच्या पर्वताबद्दल तू खूप वाईट बोललास. तू म्हणालास ‘इस्राएलचा नाश झाला आहे. मी त्याला भक्ष्याप्रमाणे चोखीन.’
इस्राएलचा नाश झाल्यावर तुला आनंद झाला होता. मी तुलाही अगदी तशीच वागणूक देईन. सेईर पर्वताचा व संपूर्ण अदोम देशाचा नाश होईल. मगच तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”