English Bible Languages

Indian Language Bible Word Collections

Bible Versions

English

Tamil

Hebrew

Greek

Malayalam

Hindi

Telugu

Kannada

Gujarati

Punjabi

Urdu

Bengali

Oriya

Marathi

Assamese

Books

Exodus Chapters

Exodus 8 Verses

1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझी उपासना करण्याकारिता जाऊ दे!
2 जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी सारा देश बेडकांनी भरून टाकीन व सगळया देशाला पीडीन.
3 नाईल नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत. बिछान्यात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, भट्ट्यात पाण्यांच्या भांड्यात येतील.
4 ते तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर चढतील.”‘
5 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्यावर उगारण्यास सांग म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
6 मग अहरोनाने मिसरमधील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
7 तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
8 मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरालाविनंति करा मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांना जाऊ देईन.”
9 मोशे फारोला म्हणाला, “हे बेडूक केव्हा दूर करावेत अशी तुमची इच्छा आहे ते मला सांगा. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करीन. मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील.”
10 फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हाला समजेल की आमच्या परमेश्वरासारखा दुसरा देव नाही.
11 बेडूक तुम्हापासून तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक याच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
12 मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वराला प्रार्थना केली.
13 मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मेले.
14 ते सडूलागले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.
15 बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने मोशे व अहरोन यांनी विचारल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
16 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
17 त्यांने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगव्व्या मिसर देशात धुळीच्या उवा बनल्या; त्या पशूवर व माणसांवर चढल्या.
18 जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर तसेच करण्याचा प्रयत्न केला परंतु धुळीतून त्यांना उवा बनविता आल्या नाहीत; त्या उवा पशूवर व लोकांच्या अंगावर राहिल्या.
19 तेव्हा जादुगारांनी फारोला सांगितले की हा चमत्कार देवाच्या सामर्थ्यानेच झाला आहे. परंतु फारोने मन कठीण केले व त्यांचे म्हणणे ऐकायचे नाकारले आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
20 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ; आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्याकडे जा. त्याला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे!
21 जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील.
22 परंतु मी इस्राएल लोकांशी मिसरच्या लोकांप्रमाणे वागणार नाही. तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात तेथे एकही गोमाशी असणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की मी परमेश्वर या पृथ्वीवर आहे.
23 तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन आणि तोच माझा पुरावा असेन.”‘
24 अशा रीतीने परमेश्वराने जे सांगितले होते त्याप्रमाणे त्याने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या वाड्यात व त्याच्या सेवकांच्या घरात शिरले; ते सगव्व्या देशात पसरले. गोमाशाच्या त्या थव्यांनी देशाची नासाडी केली.
25 म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
26 परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरच्या लोकांच्या दृष्टिने किळसवाणा असेल त्यामुळे आम्ही तो मिसरच्या लोकांसमोर केला तर ते आम्हावर दगडफेक करतील व आम्हाला मारून टाकतील.
27 तर आम्हास रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ द्या. व आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला हे करावयास सांगितले आहे.”
28 तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हाला तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देतो परंतु तीन दिवसांच्या प्रवासापेक्षा जास्त पुढे जायचे नाही; तेव्हा आता जा व माझ्यासाठीही प्रार्थना करा.”
29 मोशे म्हणाला, “पाहा, मी जातो आणि तुझ्यापासून, तुझे लोक व सेवक या सर्वापासून उद्या गोमाशा दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो परंतु यज्ञकरण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही अडवू नये.”
30 तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
31 आणि परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो. त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशा दूर केल्या. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.
32 परंतु फारो पुन्हा हट्टी व कठोर बनला आणि त्याने इस्राएली लोकाना जाऊ दिले नाही.
×

Alert

×