तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोचे काय करतो ते तू बघशील; मी माझ्या महान सामर्थ्याचा त्याच्या विरुद्ध उपयोग करीन; मग तो माझ्या लोकांना जाऊ देईल. तो त्यांना जाऊ देण्यास एवढा तयार होईल की तो त्यांना बळजबरीने घालवून देईल।”
“मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दर्शन दिले; त्यांनी मला ‘एल-शदाय’ असे नाव दिले; त्यांना ‘याव्हे’ (म्हणजे ‘परमेश्वर’) हे माझे नाव माहीत नव्हते.
तेव्हा त्यांना सांग, मी म्हणतो, ‘मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास वाचवीन व तुम्हांस स्वतंत्र करीन; तुम्ही मिसरच्या लोकांचे गुलाम राहणार नाही. मी माझ्या महान सामर्थ्याचा उपयोग करून मिसरच्या लोकांना भयंकर शिक्षा करीन व मग तुम्हाला सोडवीन.
मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी मोठा करार करून त्यांना वचन दिले की मी त्यांना एक विशेष देश देईन; तेव्हा त्या देशात मी तुम्हाला नेईन व तो देश तुम्हाला कायमचे वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.”‘
तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांना सांगितले. परंतु लोकांना एवढे काम करावे लागत होते की त्यामुळे त्यांना मोशेचे म्हणणे ऐकावयास उत्सुकता नसे म्हणून ते त्याचे ऐकेनात.
परंतु परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला आणि त्याने त्यांना इस्राएल लोकाकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याची, तसेच फारोकडे जाऊन त्याच्याशी बोलणी करण्याची आणि इस्राएल लोकांना मिसर मधून बाहेर घेऊन जाण्याची आज्ञा दिली.
इस्राएल लोकांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रमुख पुरुंषांची नावे अशी:इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हस्त्रोन व कर्मी. ही रऊबेनाची कुळे:
अहरोनाचा मुलगा एलाजार याने पुटीयेलाच्या मुलीशी लग्न केले; तिच्या पोटी त्याला फिनहास हा मुलगा झाला. हे सर्वलोक म्हणजे इस्राएलाचा मुलगा लेवी याची वंशावळ होय.