Indian Language Bible Word Collections
Exodus 40:22
Exodus Chapters
Exodus 40 Verses
Books
Old Testament
New Testament
Bible Versions
English
Tamil
Hebrew
Greek
Malayalam
Hindi
Telugu
Kannada
Gujarati
Punjabi
Urdu
Bengali
Oriya
Marathi
Assamese
Books
Old Testament
New Testament
Exodus Chapters
Exodus 40 Verses
1
मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
2
“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा पवित्र मंडप उभा कर.
3
आज्ञापटाचा कोश त्या पवित्र मंडपात ठेव व तो अंतरपटाने झांक.
4
मग तेज आणून आत ठेव व त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष मंडपात आण व त्यावरील दिवे योग्य ठिकाणी ठेव.
5
सोन्याची धूपवेदी मंडपात आण व ती आज्ञापटाच्या कोशापुढे ठेव आणि पवित्र निवास मंडपाच्या दाराचा पडदा लाव.
6
“दर्शन मंडपाच्या म्हणजे पवित्रनिवास मंडपाच्या दारापुढे होमार्पणासाठी वेदी ठेव.
7
दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यामध्ये गंगाळ ठेव व त्यात पाणी भर.
8
सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.
9
अभिषेकाचे तेल घेऊन पवित्र निवास मंडपाला व त्यातल्या सर्व वस्तूंना अभिषेक कर व त्याचे सर्व सामान पवित्र कर म्हणजे तो पवित्र होईल.
10
होमवेदी व तिची सर्व उपकरणे यांना अभिषेक करुन पवित्र कर म्हणजे ती परम पवित्र होईल.
11
गंगाळ व त्याच्या खालची बैठक ह्यांस अभिषेक कर व त्यांना पवित्र कर.
12
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.
13
मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घाल व त्याला तेलाने अभिषेक करून पवित्र कर मग तो याजक या नात्याने माझी सेवा करील.
14
मग त्याच्या मुलांना अंगरखे घाल.
15
त्याच्या बापाला जसा अभिषेक करशील त्याप्रमाणेच त्यांना कर म्हणजे याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; तू त्यांना अभिषेक केल्यावर ते याजक होतील; ते घराणे पिढ्यान्पिढ्या निरंतरचे याजकपण करीत राहील.”
16
मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली व परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे सर्वकाही त्याने केले.
17
योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली.
18
परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने पवित्र निवास मंडप उभा केला; प्रथम त्याने खुर्च्या (बैठक) बसवून घेतल्या, मग त्याने त्यांच्यावर फळया लावल्या. अडसर लावले व त्यांचे खांब उभे केले;
19
त्यानंतर पवित्र निवास मंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.
20
मोशेने करार घेऊन आज्ञापटाच्या कोशात ठेवला व कोशाला दांडे लावून त्याच्यावर दयासन ठेवले.
21
मग मोशेने तो कोश पवित्र निवास मंडपात नेला आणि योग्य ठिकाणी अंतरपट लावून आज्ञापटाचा कोश झाकला; अशा रीतीने त्याने पवित्र कोश सुरक्षित केला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
22
मग मोशेने पवित्र निवास मंडपाच्या उत्तर बाजूस दर्शन मंडपात अंतरपटाच्या समोर मेज ठेवले;
23
मग त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
24
मग त्याने पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस दर्शनमंडपात मेजासमोर दीपवृक्ष ठेवला।
25
नंतर त्याने परमेश्वरासमोर दीपवृक्षावर दिवे ठेवले; परमेश्वरने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
26
मग त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.
27
नंतर त्याने तिच्यावर सुगंधी धूप जाळला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.
28
मग त्याने पवित्र निवास मंडपाच्या दाराला पडदा लावला.
29
त्याने पवित्र निवास मंडपाच्या दर्शन मंडपाच्या दारापाशी होमवेदी ठेवली व तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे वाहिली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
30
मग त्याने दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यामध्ये गंगाळ ठेवले व धुण्यासाठी त्यात पाणी भरले.
31
मोशे, अहरोन व अहरोनाची मुले त्यात आपापले हातपाय धूत असत;
32
ते दर्शनमंडप व वेदीपाशी जाताना प्रत्येक वेळेस आपले हातपाय तेथे धूत असत; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
33
मग त्याने पवित्र निवास मंडपाभोवती अंगणाची कनात उभी केली व अंगणात वेदी बसवली आणि अंगणाच्या फाटकास पडदा लावला; ह्या प्रकारे परमेश्वराने सांगितल्या प्रमाणे मोशेने सर्व काम संपविले.
34
मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
35
दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने पवित्र निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
36
पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरु करीत;
37
परंतु तो मेघ पवित्र निवास मंडपावर असे पर्यंत लोक तेथून हलत नसत; तो वर जाई पर्यंत ते तेथेच थांबत.
38
परमेश्वराचा मेघ दिवसा पवित्र निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.