पवित्र स्थानात सेवा करताना याजकांनी घालावयाची निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताची पवित्र वस्त्रे कारागिरांनी तयार केली; अहरोनासाठीही परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुतात व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली.
त्यांनी कमरपट्टा विणला व तो एफोदाला अडकवला. हा पट्टाही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याच्या जरीचा, निव्व्या, जांभव्व्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा त्यांनी तयार केला.
इस्राएलाच्या (याकोबाच्या) प्रत्येक मुलासाठी एक या प्रमाणे ती बारा रत्ने न्यायाच्या ऊरपटावर होती; एकेका रत्नावर एकेका मुलाचे नांव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
त्यांनी नंतर न्यायाच्या ऊरपटाच्या गोल कड्या एफोदाच्या गोल कड्यांनी निव्व्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो एफोदावर घट्ट बसावा; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरुं मग डाळींब, पुन्हा घुंगरु मग डाळींब याप्रमाणे दोन डाळींबामध्ये एक घुंगरुं अशी ती झाली; हा झगा याजकाने परमेश्वराची सेवा करताना घालावयासाठी होता; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा कमरपट्टा बनविला व त्यावर नक्षी काढली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
अशा प्रकारे पवित्र निवास मंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले.
मग त्यांनी मोशेला सर्व सामान दाखवले; म्हणजे पवित्र निवास मंडप आणि तंबू व त्याचे सर्व समान म्हणजे गोल कड्या, आकड्या फळया, अडसर, खांब खांबाच्या खुर्च्या (बैठक);
अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या खुर्च्या (बैठक), अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा तणावे, मेखा व पवित्र निवास मंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य:
पवित्र निवास मंडप, म्हणजे दर्शन मंडप सेवा करण्यासाठी विणलेली वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे;