परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन व त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन व त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;
याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद व न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा;
मग त्यांना कमरबंद बांधावेत व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांना याजकपद मिळेल व ते कायम राहील. ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले यांच्यावर संस्कार करुन तू त्यांना याजक बनवावेस.
मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरवी, काळजाभोंवतीची चरवी आणि दोन्ही गुरदे व त्यांच्या भोवतीची चरबी अशी त्या गोऱ्ह्याच्या शरीरातील सर्व चरबी काढून घ्यावी व गुरदे व तिचा वेदीवर होम करावा.
मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.
मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या आंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे.
नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, व त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर व त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले व त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन व त्याची मुले माझे याजक आहेत व ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.
मग त्या सर्व वस्तू अहरोन व त्याच्या मुलांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर व वेदीवर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.
नंतर अहरोन व त्याची मुले ह्यांच्या समर्पण विधीसाठी मारलेल्या मेढ्याचे अर्पिलेले ऊर व मांडी ही अहरोन व त्याच्या मुलांना द्यावी; हे अर्पण त्यांच्यासाठी पवित्र होईल.
इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे यांना अर्पणाचा हा हिस्सा नेहमी द्यावा; ते जेव्हा परमेश्वराला अर्पणे आणतील तेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाच्या हक्काचा म्हणून राहील; आणि इस्राएल लोक जेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाला देतील तेव्हा ते परमेश्वराला दिलेल्या समर्पणासारखे होईल.
“अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर सांभाळून ठेवावीत; ती त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावीत, जेव्हा त्यांची याजक म्हणून निवड होईल तेव्हा त्यांनी ती घालावीत.
समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; ते फक्त पवित्र ठिकाणी व विशेष वेळी खाण्यासारखे आहे.
त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे
आणि संध्याकाळी दुसऱ्या कोकराबरोबरही सकाळच्या अर्पणाप्रमाणे आठमापे सपीठ अर्पण करावे व पाव हीन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे; ह्या हव्याच्या मधुर सुवासाने परमेश्वराला संतोष होईल.
आणि लोकांना समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहाता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मीच परमेश्वर त्यांचा देव आहे.”