वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे बनवावी; प्रत्येक शिंग त्याच्या कोपऱ्यास जोडावे म्हणजे ते सर्व सलग व अखंड दिसेल; मग वेदी पितळेने मढवावी.
वेदीच्या उत्तर बाजूसही दक्षिण बाजूप्रमाणे पन्नास यार्ड (वार) लांबीची कनात, तिच्यासाठी वीस खांब, पितळेच्या वीस बैठका आणि चांदीच्या आकड्या व गज हे सर्व असावे.
“अंगणाच्या फाटकासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा दहा यार्ड (वार) लांबीचा पडदा असावा व त्यावर नक्षीचे विणकाम असावे; पडद्यासाठी चार खांब व चार खुर्च्या असाव्यात.
अंगण पन्नास गज लांब व पंचवीस गज रुंद असावे; अंगणाभोवतीची पडद्याची कनात अडीच गज उंच असावी व ती कातलेल्या तनलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात.
अहरोन व त्याची मुले यांनी दिवा जळत ठेवण्याची काळजी घ्यावी; अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपात त्यांनी जावे; आणि तो दीपवृक्ष संध्याकाळापासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची खातरीने सोय करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधी आहे; तो त्यांनी पाळलाच पाहिचे.”