तेव्हा मोशेने सर्व आज्ञा लिहून काढल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलच्या बारा वंशासाठी, प्रत्येक वंशास एक याप्रमाणे बारा दगड तेथे रोवून स्तंभ उभे केले.
मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”
मग मोशेने भांड्यांतील अर्पणाचे रक्त लोकावर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी विशेष करार केला आहे असे हे रक्त दर्शीविते; त्याचे स्पष्टीकरण देवाने दिलेल्या नियमांमध्ये आहे.”
मोशे इस्राएलच्या वडीलधाऱ्या माणसांना म्हणाला, “तुम्ही येथे आम्हासाठी थांबा, मी परत येईपर्यत अहरोन व हूर हे तुम्हावर अधिकारी म्हणून राहतील; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”