त्याने तुमच्यासाठी केलेले सर्व प्रताप आज आठवा. हे मी तुम्हांलाच सांगत आहे. तुमच्या मुलाबाळांना नव्हे. कारण त्यांनी यापैकी काहीच पाहिले, अनुभवले नाही. त्याची थोरवी, त्याचे सामर्थ्य व पराक्रम तुम्ही पाहिलेले आहे.
मिसरचे सैन्य, त्यांचे घोडे, रथ यांची कशी दैना झाली, तुमचा ते पाठलाग करत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला हेही तुम्ही पाहिले. परमेश्वराने त्यांना पूर्ण नेस्तनाबूत केले.
त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.
“तेव्हा आज मी देतो ती प्रत्येक आज्ञा कटाक्षाने पाळा त्यामुळे तुम्ही बलशाली व्हाल, यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घ्यायला तुम्ही सिद्ध झाला आहात तो हस्तगत कराल.
तुम्ही जिथे जाणार आहात तो प्रदेश तुम्ही सोडून आलेल्या मिसरसारखा नाही. तेथे तुम्ही पेरणी झाल्यावर भाजीचा मळा शिंपावा तसे पायाने कालव्याचे पाणी ओढून देत होता.
“परमेश्वर म्हणतो, ‘ज्या आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
तसे केलेत तर परमेश्वराचा कोप होईल. तो आकाश बंद करील आणि मग पाऊस पडणार नाही. जमिनीत पीक येणार नाही. जो चांगला देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यात तुम्हांला लौकरच मरण येईल.
जेथे जेथे तुम्ही पाय ठेवाल ती जमीन तुमची होईल. दक्षिणेतील वाळवंटापासून उत्तरेला लबानोन पर्यंत आणि पूर्वेला फरात नदीपासून पश्चिमेला समुद्रापर्यंत एवढा प्रदेश तुमचा होईल.
पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळलात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वराला तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हाला ओळख नाही.
“तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्या प्रदेशात घेऊन जाईल. तुम्ही लौकरच तो प्रदेश ताब्यात घ्याल. तेथे गेल्याबरोबर तुम्ही गरिज्जीम डोंगरावर जा, व आशीर्वाद उच्चारा. मग तेथून एबाल डोंगरावर जाऊन शापवाणीचा उच्चार करा.