सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्याला दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्याला विचारले, “तूच सीबा काय?” सीबा म्हणाला, “होय, मीच तुमचा दास सीबा.”
तेव्हा राजा म्हणाला, “शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे.” सीबा राजाला म्हणाला, “योनाथानचा मुलगाच आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.”
त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंकतीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”
त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.” सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते.
सीबा दावीदाला म्हणाला, “मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन.” तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला.