रोज लौकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोले. चौकशी करुन तो विचारी, “तू कोणत्या शहरातून आलास?” तो सांगत असे. “मी इस्राएलच्या अमुक अमुक वंशातला”
अबशालोम पुढे म्हणे, “मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करु शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन.”
अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्याला आभिवादन करु लागला तर अबशालोम त्या माणसाला मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करुन तो त्याला स्पर्श करी. त्याचे चुंबन घेई.
अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.
तेव्हा यरुशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, “आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निधून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरुशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.”
तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार. तू कशाला भटकंत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर. तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.”
सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा करारकोश घेऊन निघाले होते. त्यानी देवाचा पवित्रकोश खाली ठेवला. यरुशलेममधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून प्रार्थना म्हणत होता.प्रार्थना म्हणत होता.
राजा दावीद सादोकला म्हणाला, “हा देवाचा पवित्र कोश यरुशलेमला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरुशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल.
दावीद डोंगरमाथ्यावर पोहोंचला. येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे त्या वेळी हूशय अकर् त्याला भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता, त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.
पण तू यरुशलेमला परलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिलवू शकशील. अबशालोमला सांग, “महाराज, मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. पण आता तुमची सेवा करीन.’