यरुशलेमला आल्यावर रहबामने 1,80,000 उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामिन या घराण्यांमधून त्याने ही निवड केली. इस्राएलशी युध्द करुन स्वत:कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्याने ही जमवाजमव केली.
परमेश्वराचे म्हणणे असे आहे ‘आपल्या बांधवांशीच लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.”‘ तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परतले. यराबामवर त्यांनी हल्ला केला नाही.
प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करुन गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामिन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.
लेवींनी आपली शेती आणि शिवारे सोडली आणि ते यहूदा व यरुशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे मुलगे यांनी लेवींना प्रतिबंध केला म्हणून ते आले.
इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमला आले.
रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.