1
|
यहूदाला मिळालेल्या प्रदेशाच्या, त्या वंशातील कुळांप्रमाणे वाटण्या झाल्या. हा प्रदेश अदोमाच्या सीमेपर्यंत आणि तेमानलगतच्या सीन वाळवंटापर्यंत पार दक्षिणेपर्यंत पसरला होता. |
2
|
दक्षिणेची सीमा क्षारसमुद्राच्या दक्षिणे कडील टोकाशी सुरु होत होती. |
3
|
ती तशीच पुढे अक्राब्बीमच्या चढणीकडून सीन वाळवंटावरुन कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जाऊन मग हेस्रोन वरुन अद्दार पर्यंत जाते. तिथे एक वळण घेऊन ककर्ाकडे जाते. |
4
|
तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या ओढ्यापर्यंत निघते. तिचा शेवट भूमध्यसमुद्रापाशी होती. ही झाली दक्षिण सीमा. |
5
|
यार्देन नदी समुद्राला मिळते तेथून क्षारसमुद्राच्या संपूर्ण(पश्चिम) किनाऱ्यापर्यंत पूर्वेकडील हद्द.यार्देन क्षार समुद्राला मिळते तेथे या प्रदेशाची उत्तरेकडील हद्द सुरु होते. |
6
|
बेथ-हाग्लाच्या चढणीवरुन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत ती जाते. |
7
|
तेथून ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेला गिलगालकडे वळते. हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढणीसमोर नदीच्या दक्षिणेला आहे. एन-शेमेश नावाच्या झऱ्याजवळून गेल्यावर या सीमेचा शेवट एन रोगेल येथे होतो. |
8
|
तेथून ती सीमा हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यातून यबूसी म्हणजेच यरुशलेमच्चा दक्षिणेकडून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या, पहाडाच्या माथ्यावर गेली आहे. |
9
|
तेथून ती सीमा नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते आणि एफ्रोन डोंगरातील नगरांरुन निघून बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथपर्यंत पोचते. |
10
|
मग बालापासून ही सीमा पश्चिमेला सेईर डोंगराकडे वळून यारीम डोंगर (म्हणजेच कसालोन) याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून जाते आणि बेथ-शेमेशकडे उत्तरून तिम्नाकडे जाते. |
11
|
मग एक्रोनच्या उत्तरेकडे असलेल्या टेकडीकडे आणि तेथून शिक्रोनापर्यंत पुढे जाऊन बाला डोंगराजवळून यबनेलास पर्यंत जाऊन भूमध्यसमुद्रापाशी तिचा शेवट होतो. |
12
|
भूमध्यसमुद्र ही यहूदाच्या भूमीची पश्चिमेकडील हद्द. तेव्हा या चतु:सीमेच्या आतील प्रदेशात यहूदाचे यहूदाचे वंशज राहिले. |
13
|
यकुन्नेचा मुलगा कालेब याला यहूदाच्या प्रदेशातील काही भूमी द्यायची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली होती. त्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने कालेबला किर्याथ-आर्बा (हेब्रोन) हे नगर दिले. (आर्बा हा अनाकचा पिता) |
14
|
शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले. |
15
|
मग दबीरा येथे राहणाऱ्यांवर कालेब चढाई करुन गेला. (दबीरला पूर्वी किर्याथ-सेफर असेही म्हणत.) |
16
|
कालेब म्हणाला, “किर्याथ-सेफरचा मला पाडाव करायचा आहे. जो कोणी या शहरावर चढाई करुन त्याचा पराभकरील त्याला मी माझी मुलगी अखसा देईन. त्यांचे लग्न लावून देईन. |
17
|
कनाज याचा मुलगा अथनिएल याने हे शहर घेतले. तेव्हा कालेबने त्याचा अखसाशी विवाह करुन दिला. |
18
|
अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?” |
19
|
अखसा म्हणाली, “मला एक भेट द्या. तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत. आता पाणी असलेली जमीन द्या” तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले. त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या बाजूचे झरे दिले. |
20
|
यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले. |
21
|
नेगेवच्या दक्षीणभागातील, अदोमच्या सीमेजवळची सर्व नगरे त्यांना मिळाली. त्यांची यादी खालीलप्रमाणे; कबसेल, एदेर, यागूर, |
25
|
हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन म्हणजेच हासोर. |
27
|
हसर-गादा, हेष्मोन व बेथ-पेलेट, |
28
|
हसर-शुवाल, बैर-शेबा, बिजोथा, |
30
|
एल्तोलाद, कसील व हर्मा, |
31
|
सिकलाग, मदान्ना सन्सन्रा, |
32
|
लवावोथ, शिलहीम, अईन, रिम्मोन. सर्व मिळून ही एकोणतीस नगरे व त्या भोवतालची शेतजमीन. पश्चिमेकडील डोंगरपायथावरची नगरेही यहूदाच्या कुळातील लोकांना मिळाली. ती नगरे अशी. |
34
|
जानोह, एन-गन्रीम, तप्पूहा, एनाम, |
35
|
यर्मूथ अदुल्लाम, सोखो, अजेका, |
36
|
शारईम, अदीथईम, गदेरा किवा गदेरोथईम ही चौदा गावे व भोवतालची शेतजमीन. |
37
|
शिवाय ही गावे सनान, हदाशा, मिग्दल गाद, |
41
|
गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा ही सोळा नगरे व भोवतालचे वावर. |
44
|
कईला, अकजीब आणि मारेशा ही नऊ नगरे व आसपासची जमीन ही मिळाली. |
45
|
एक्रोन, त्या भोवतालची खेडी व जमीन तसेच एक्रोनच्या परिचमेकडील भाग आणि आश्दोद जवळची सर्व गावे व जमीन यहूदाच्या वंशजांना मिळाली. |
47
|
आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश व गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश व त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता. |
48
|
आणि डोंगराळ प्रदेशातील शामीर, यत्तीर, सोखो, |
49
|
दन्ना, किर्याथ-सन्ना (म्हणजेच दबीर) |
51
|
गोशेन, होलोन व गिलो ही अकारा नगरे व आसपासची गावे त्यांना मिळाली. |
53
|
यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका, |
54
|
हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजेच हेब्रोन) व सियोर ही नऊ नगरे व त्या भोवतालची खेडी त्यांना मिळाली. |
55
|
मावोन कर्मेल जीफ, यूटा, |
57
|
काइन, गिबा तिम्रा ही दहा नगरे व आसपासची गावे, |
58
|
हल्हूल, बेथ-सूर, गदोर, |
59
|
माराथ, बेथ-अनोथ, एलतकान ही सहा नगरे व त्या जवळची गावे ही सुध्दा मिळाली. |
60
|
राब्बा व किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) ही दोन शहरेही त्यांना मिळाली. |
61
|
त्याचप्रमाणे वाळवंटातील काही गावेही. त्यांची यादी: बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा, |
62
|
निबशान, क्षारनगर व एन-गेदी ही सहानगरे व त्यांच्या भोवतालची खेडी. |
63
|
तथापि, यरुशलेममधील यबूसी लोकांना यहूदाचे सैन्य बाहेर काढू शकले नाही. म्हणून यरुशलेम मध्ये आजही यहूदांबरोबर यबूसी लोक राहतात. |
Joshua 15:22 English Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...