1
|
पवित्र स्थानात सेवा करताना याजकांनी घालावयाची निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताची पवित्र वस्त्रे कारागिरांनी तयार केली; अहरोनासाठीही परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली. |
2
|
त्यांनी सोन्याच्या जरीचा आणि निव्व्या, जांभव्व्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा एफोद तयार केला. |
3
|
त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुतात व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली. |
4
|
त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या |
5
|
त्यांनी कमरपट्टा विणला व तो एफोदाला अडकवला. हा पट्टाही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याच्या जरीचा, निव्व्या, जांभव्व्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा त्यांनी तयार केला. |
6
|
कारागिरांनी इस्राएलच्या मुलांची नांवे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली. |
7
|
मग देवाला इस्राएल लोकांची आठवण राहावी म्हणून त्यांनी ती रत्ने एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. |
8
|
नंतर त्यांनी कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा न्यायाचा ऊरपट बनवून घेलता. |
9
|
न्यायाचा ऊरपट चौरस व्हावा म्हणून तो दुमडला; तो नऊइंच लांब व नऊ इंच रुंद असा चौरस होता. |
10
|
मग कारागिरांनी त्या न्यायाच्या ऊरपटावर सुंदर रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक; |
11
|
दुसऱ्या रांगेत पाचू नीलमणी व हिरा; |
12
|
तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पक्षराग; |
13
|
आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली. |
14
|
इस्राएलाच्या (याकोबाच्या) प्रत्येक मुलासाठी एक या प्रमाणे ती बारा रत्ने न्यायाच्या ऊरपटावर होती; एकेका रत्नावर एकेका मुलाचे नांव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते. |
15
|
दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखव्व्या त्यांनी न्यायाच्या ऊरपटावर लावल्या. |
16
|
कारागिरांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन गोल कड्या बनवून त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या. |
17
|
मग त्यांनी न्यायाच्या ऊपपटांऱ्या टोकांस लावलेल्या दोन्ही गोल कड्यात पीळ घातलेल्या सोन्याच्या साखव्व्या घातल्या. |
18
|
पीळ घातलेल्या दोन्ही साखव्व्यांनी दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या. |
19
|
मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करून त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या. |
20
|
त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या खांदपट्ट्यांच्या तळाला एफोदाच्या समोर लावल्या. |
21
|
त्यांनी नंतर न्यायाच्या ऊरपटाच्या गोल कड्या एफोदाच्या गोल कड्यांनी निव्व्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो एफोदावर घट्ट बसावा; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले. |
22
|
नंतर त्यांनी एफोदाबरोबर घालावयाचा निव्व्या रंगाच्या सुताचा झगा कारागिराकडून विणून घेतला. |
23
|
त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला. |
24
|
मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळींबे काढली. |
25
|
नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती डाळींबाच्यामध्ये लावली. |
26
|
झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरुं मग डाळींब, पुन्हा घुंगरु मग डाळींब याप्रमाणे दोन डाळींबामध्ये एक घुंगरुं अशी ती झाली; हा झगा याजकाने परमेश्वराची सेवा करताना घालावयासाठी होता; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. |
27
|
कारागिरांनी अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे कुडते केले. |
28
|
आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व चोळणे केले. |
29
|
मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा कमरपट्टा बनविला व त्यावर नक्षी काढली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. |
30
|
मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वर पवित्र” अशी अक्षरे कोरली. |
31
|
त्यांनी ती सोन्याची पट्टी निव्व्या फितीवर लावली व ती निळी फीत मंदिला भोवती समोर बांधली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. |
32
|
अशा प्रकारे पवित्र निवास मंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले. |
33
|
मग त्यांनी मोशेला सर्व सामान दाखवले; म्हणजे पवित्र निवास मंडप आणि तंबू व त्याचे सर्व समान म्हणजे गोल कड्या, आकड्या फळया, अडसर, खांब खांबाच्या खुर्च्या (बैठक); |
34
|
आणि लाल रंगविलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशाची कातडी वे अंतरपट; |
35
|
आज्ञापटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन। |
36
|
मेज, त्यावरील सर्व सामान व पवित्र समक्षतेची भाकर; |
37
|
शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल; |
38
|
सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा; |
39
|
पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक: |
40
|
अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या खुर्च्या (बैठक), अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा तणावे, मेखा व पवित्र निवास मंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य: |
41
|
पवित्र निवास मंडप, म्हणजे दर्शन मंडप सेवा करण्यासाठी विणलेली वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे; |
42
|
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले. |
43
|
लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला. |
Exodus 39:24 English Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...