1
|
मग मोशेने सगळया इस्राएल लोकांना एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, “ज्या आज्ञा तुम्ही पाळाव्या म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो; |
2
|
“कामकाजासाठी सहा दिवस आहेत परंतु सातवा दिवस विसाव्यासाठी पवित्र दिवस आहे, तो पाळून विसावा घेतल्यामुळे तुम्ही परमेश्वराचा सन्मान कराल. सातव्या दिवशी-शब्बाथ दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे. |
3
|
शब्बाथ दिवशी तुम्ही राहात असलेल्या जागेत कोठेही तुम्ही विस्तव देखील पेटवू नये.” |
4
|
मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा. |
5
|
परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ; |
6
|
निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस; |
7
|
लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड; |
8
|
दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले; |
9
|
तसेच एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी. |
10
|
“जे तुम्ही कारागीर आहात त्या तुम्ही परमेश्वराने आज्ञा केलेल्या सर्व वस्तू तयार कराव्यात म्हणजे, |
11
|
पवित्र निवास मंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फव्व्या, अडसर, खांब, व खुर्च्या; |
12
|
पवित्र कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट, |
13
|
मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची पवित्र भाकर; |
14
|
प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आमि दिव्यासाठी तेल; |
15
|
धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी धूप, पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी पडदा; |
16
|
होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, पितळेचे गंगाळ व त्याची बैठक; |
17
|
अंगणाभोवतीच्या कनातीचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या खुर्च्या, आणि अंगणाचे दार झाकण्यासाठी पडदा; |
18
|
निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी आधार देणाऱ्या मेखा व तणावासाठी लागणाऱ्या दोऱ्या; |
19
|
पवित्र स्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या मुलांची पवित्र वस्त्रे.” |
20
|
मग सर्व इस्राएल लोक मोशेपुढून निघून गेले. |
21
|
नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली. |
22
|
ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली. |
23
|
ज्यांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले. |
24
|
चांदी व पितळ अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले. |
25
|
ज्या स्त्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले. |
26
|
ज्या इतर स्त्रियांना मदत करण्याची इच्छा झाली त्या सर्वानी आपले कौशल्य दाखवून बकऱ्याच्या केसाचे कापड आणले. |
27
|
अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली. |
28
|
लोकांनी सुगंधी मसाले व जैतूनाचे तेल देखील आणले त्यांचा उपयोग सुगंधी धूप अभिषेकाचे तेल आणि दिव्याचे तेल यासाठी करण्यात आला. |
29
|
ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला. |
30
|
तेव्हा मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पहा परमेश्वराने यहुदा वंशातील उरी (उरी हा हूरचा पुत्र होता) ह्याचा मुलगा बसालेल ह्याची निवड केली आहे. |
31
|
परमेश्वराच्या आत्म्याने बसालेल याला भरले आहे त्याला सर्व प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी कसब आणि ज्ञान दिले आहे. |
32
|
तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करील. |
33
|
तो हिऱ्यांना पैलू पाडून हिरे आणि रत्ने जडवून देईल. बसालेल लाकूड कामही करून त्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवील. |
34
|
परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब, याला ह्या विशेष कला इतरांना शिकविण्याचे सामर्थ्य दिले आहे. |
35
|
कोरीव काम करणारे कुशल सुतार, धातू काम करणारे कारागीर, निळया, जांभळया ज्ञान व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसवी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या. सर्व कारागिरीची कामे ते करु शकतात कारण परमेश्वराने त्यासाठी ह्या दोघांना ज्ञान व कसब दिले आहे.” |
Exodus 35:18 English Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...