1
|
जेव्हा तुम्ही महत्वाच्या लोकांबरोबर बसता आणि खाता तेव्हा तुम्ही कुणाबरोबर आहात याचे भान ठेवा. |
2
|
जरी तुम्हाला खूप भूक लागलेली असली तरी कधीही जास्त खाऊ नका. |
3
|
आणि तो जे चांगले पदार्थ वाढतो तेही जास्त खाऊ नका. तो कदाचित् एखादा डाव असू शकेल. |
4
|
श्रीमंत होण्याचा प्रयत्न करताना तब्येतीची हेळसांड करु नका. तुम्ही शहाणे असाल तर धीर धराल. |
5
|
पैसा फार लवकर जातो. जणूकाही त्याला पंख फुटतात आणि तो पक्ष्यासारखा उडून जातो. |
6
|
स्वार्थी माणसाबरोबर खाऊ नका. आणि त्याला जे खास भोजन आवडते त्यापासून दूर राहा. |
7
|
जो नेहमी किंमतीचा विचार करणारा माणूस आहे. तो कदाचित् तुम्हाला म्हणेल, ‘खा आणि प्या’ पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही. |
8
|
आणि तुम्ही जर त्याचे अन्न खाल्ले तर तुम्ही आजारी पडाल आणि तुम्हाला शरम वाटेल. |
9
|
मूर्खाला शिकवायचा प्रयत्न करु नका. तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांची थट्टा करील. |
10
|
जुनी जमीन जायदादीची रेषा कधीही सरकवू नका. आणि निराधार मुलाची जमीन कधीही बळकावू नका. |
11
|
परमेश्वर तुमच्या विरुध्द जाईल. परमेश्वर शक्तिशाली आहे आणि तो त्या निराधार मुलाचे रक्षण करील. |
12
|
तुमच्या शिक्षकाचे ऐका आणि जेवढे शिकता येईल तेवढे शिका. |
13
|
गरज पडेल तेव्हा मुलाला नेहमी शिक्षा करा. तुम्ही त्याला चापट मारली तर त्याला ती लागणार नाही. |
14
|
चापटी मारुन तुम्ही त्याला मृत्यूपासून वाचवू शकाल. |
15
|
मुला, तू जर शहाणा झालास तर मी खूप आनंदी होईन. |
16
|
तू योग्य गोष्टी बोलू लागलास, तू योग्य गोष्टी बोलताना मी ऐकले तर मला खूप आनंद होईल. |
17
|
दुष्ट लोकांचा मत्सर करु नका. पण परमेश्वराचा आदर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची परकाष्ठा करा. |
18
|
आशेला नेहमीच जागा असते. आणि ती आशा अमर आहे. |
19
|
म्हणून मुला, लक्ष दे आणि शहाणा हो. योग्य रीतीने जगण्याची काळजी घे. |
20
|
खूप खाणाऱ्या आणि खूप द्राक्षारस पिणाऱ्या लोकांशी मैत्री करु नकोस. |
21
|
जे लोक खूप खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्त खातात, पितात आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही. |
22
|
तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर. |
23
|
सत्य, शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा या गोष्टी पैसे मोजून घेण्याइतक्या मौल्यवान आहेत. आणि त्यांचे मूल्य त्या विकून टाकता न येण्याइतके अधिक आहे. |
24
|
चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात. एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते. |
25
|
म्हणून तुमच्या आई - वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या. |
26
|
मुला, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे आयुष्य तुुझ्यासमोर उदाहरणादाखल राहू दे. |
27
|
वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही. |
28
|
वाईट स्त्री चोरासारखी तुमची वाट बघत असते. आणि ती पुष्कळ पुरुषांना पाप करायला लावते. |
29
|
जे लोक खूप द्राक्षारस पितात आणि कडक मद्य घेतात, त्यांच्याकरता ते खूप वाईट आहे. ते लोक खूप भांडणे आणि वाद - विवाद करतात. त्यांचे डोळे पण लाल असतात. ते अडखळतात आणि पडतात. ही सगळी संकटे त्यांना टाळता आली असती. |
31
|
म्हणून द्राक्षारसापासून सावध राहा. तो सुंदर आणि लाल दिसतो. तो पोल्यात चकाकतो आणि तुम्ही पिता तेव्हा तो अगदी सरळपणे जातो. |
32
|
पण शेवटी तो सापासारखा चावतो. |
33
|
द्राक्षारसामुळे तुम्ही चित्रविचित्र गोष्टी बघायला लागता. तुमचे मन गोंधळून जाते. |
34
|
तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल. |
35
|
तुम्ही म्हणाल, “त्यांना मला मारले पण मला ते कळलेसुध्दा नाही. त्यांनी मला खूप मारले पण मला ते आठवत नाही. आता मी जागा होऊ शकत नाही. मला आणखी प्यायला द्या.” |
Proverbs 23:32 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...