1
|
परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, |
2
|
“इस्राएल लोकांना ही आज्ञा दे: तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या. |
3
|
दक्षिणे कडे अदोमजवळच्या त्सीन वाळवंटाचा काही भाग तुम्हाला मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल. |
4
|
तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करुन ती त्सीन वाळवंटातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल. |
5
|
असमोनहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि भूमध्यसमुद्रात तिची समाप्ती होईल. |
6
|
तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे भूमध्यसमुद्र (महासमुद्र). |
7
|
तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये). |
8
|
होर पर्वतावरुन ती लेबो-हमासला जाईल व तेथून सदादला. |
9
|
नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा. |
10
|
तुमची पूर्व सीमा एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल. |
11
|
शफामपासून ती अईनच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा गालीली तलावाजवळच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल. |
12
|
आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.” |
13
|
तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना या आज्ञा दिल्या, “तुम्हाला हा प्रदेश मिळेल. तुम्ही नऊ कुळात आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळात जमिनीची विभागणी करण्यासाठी चिठ्ठ्या टाकाल. |
14
|
रऊबेन आणि गादची कुळे आणि मनश्शेच्या अर्ध्या कुळांनी आधीच त्यांची जमीन घेतली आहे. |
15
|
त्या अडीच कुळानी यरीहोजवळ यार्देन नदीच्या पूर्वेकडची जागा घेतली आहे.” |
16
|
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, |
17
|
“जमिनीची विभागणी करण्यासाठी तुला या माणसांची मदत होईल: याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा. |
18
|
आणि सर्व कुळांचे प्रमुख. प्रत्येक कुळाचा एक प्रमुख असेल. ते लोक जमिनीची विभागणी करतील. |
19
|
प्रमुखांची ही नावे आहेत:यहुदाच्या वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब. |
20
|
शिमोनेच्या कुटुंबातील अम्मीहुदाचा मुलगा शमुवेल. |
21
|
बन्यामिनच्या कुटुंबातील किसलोनच्या मुलगा अलीदाद. |
22
|
दानी कुटुंबातील यागलीचा मुलगा बुक्की. |
23
|
योसेफच्या वंशातील मनश्शेच्या कुटुंबातील एफोदचा मुलगा हन्नीएल. |
24
|
एफ्राईम कुटुंबातील शिफटानचा मुलगा कमुवेल. |
25
|
जबुलून वंशातील पर्नाकचा मुलगा अलीसाफान. |
26
|
इस्साखार वंशातील अज्जानचा मुलगा पलटीयेल. |
27
|
आशेरी वंशातील शलोमीचा मुलगा अहीहूद. |
28
|
आणि नप्ताली वंशातील अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.” |
29
|
परमेश्वराने कनानच्या भूमीची इस्राएल लोकांमध्ये वाटणी करण्यासाठी या माणसांची निवड केली. |
Numbers 34:12 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...