1
|
तेमानच्या अलिफाजाने उत्तर दिले:“मी काहीतरी बोललेच पाहिजे. मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?” |
3
|
ईयोब, तू खूप लोकांना शिकवलं आहेस. अशक्त हातांना तू शक्ती दिली आहेस. |
4
|
खाली पडणाऱ्या लोकांना तू तुझ्या शब्दांनी सावरले आहेस. ज्यांच्यात स्वत:हून उभे राहण्याचे बळ नव्हते त्यांना तू सबळ केले आहेस. |
5
|
पण आता तुझ्यावर संकटे आली असताना तू खचला आहेस. संकटे कोसळल्यावर तू कष्टी झाला आहेस. |
6
|
तू देवाची भक्ती करतोस. तुझा त्याच्यावर विश्वास आहे. तू चांगला माणूस आहेस आणि तीच तुझी आशा असू दे. |
7
|
“ईयोब, तू याचा विचार कर. निष्पाप माणसाचा कधी नाश केला गेला नाही. चांगल्या लोकांचा कधीच नि:पात होत नाही. |
8
|
मला काही अन्यायी आणि आयुष्य कष्टी करणारे लोक माहित आहेत, पण अशा लोकांना नेहमी शासन होते. |
9
|
असे लोक देवाच्या शिक्षेमुळे मारले जातात. देवाचा क्रोध त्यांना नष्ट करतो. |
10
|
वाईट लोक सिंहासारखी गर्जना करतात आणि गुरगुर करतात. परंतु देव त्यांना मुके करतो आणि त्यांचे दात पाडतो. |
11
|
हे वाईट लोक ठार मारण्यासाठी ज्यांना कोणी प्राणी मिळत नाही अशा सिंहाप्रमाणे असतात. ते मरतात आणि त्यांची मुले इतस्तत: भटकत राहातात. |
12
|
“माझ्याकडे गुप्तपणे एक निरोप आला आणि माझ्या कानी त्याची कुजबुज पडली. |
13
|
त्यामुळे एखाद्या भयंकर स्वप्नाने झोप चाळवावी तशी माझी झोप चाळवली गेली. |
14
|
मी घाबरलो. माझा थरकाप झाला. माझी सगळी हाडे थरथर कापू लागली. |
15
|
एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि माझ्या शरीरावरचे सगळे केस उभे राहिले. |
16
|
तो आत्मा निश्र्चल उभा राहिला पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही. माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता आणि सर्वत्र शांतता होती. आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला: |
17
|
‘देवापेक्षा माणूस जास्त बरोबर असू शकत नाही. माणूस त्याच्या निर्मात्यापेक्षा अधिक पवित्र असू शकत नाही. |
18
|
हे बघा, देव त्याच्या स्वर्गातील दूतांवर देखील विश्वास टाकू शकत नाही. त्याला स्वत:च्या दूतांमध्ये सुध्दा काही दोष आढळतात. |
19
|
तेव्हा माणसे नक्कीच वाईट आहेत. ते मातीच्या घरात राहातात (म्हणजे त्यांचे शरीर नाशवंत आहे) आणि या मातीच्या घरांचा पाया मातीतच असतो. ते पतंगापेक्षाही (किड्यापेक्षाही) अधिक सहजतेने चिरडले जातात. |
20
|
माणसे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मरत असतात आणि ते कोणाच्या लक्षातही येत नाही. ते मरतात आणि कधीच परत न येण्यासाठी निघून जातात. |
21
|
त्यांच्या तंबूच्या दोन्या वर खेचल्या जातातआणि ते शहाणपणा न मिळवताच मरतात.’ |
Job 4:18 Bengali Language Bible Words basic statistical display
COMING SOON ...